अडावदला शांतता समितीच्या बैठकीत सपोनि प्रमोद वाघ यांचे प्रतिपादन
साईमत/अडावद, ता.चोपडा/प्रतिनिधी :
गुलालऐवजी फुलांची उधळण केल्यास सणांचा आनंद द्विगुणित होईल. जो कायद्याचा आदर करतो आम्ही त्याचा आदर करतो, असे प्रतिपादन नव्यानेच हजर झालेले सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी केले. अडावद येथील पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक बोलावली होती. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच बबन खा तडवी होते.
प्रथम काही सदस्यांनी सपोनि यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आगामी येणारे सण कसे शांततेत साजरे होतील, यावर सपोनि यांनी सदस्यांशी चर्चा केली.
बैठकीत तंटामुक्तीचे अध्यक्ष साखरलाल महाजन, माजी सरपंच कबीरोद्दीन शेख, पिंटू दहाड, सचिन महाजन, अमजद कुरेशी, पिरू सेठ, फजल शेख, महेश दहाड, हनुमान महाजन, ताहेर शेख, जावेद खान, अरशद अली, लक्ष्मण महाजन, वजहात काजी, भैय्या साळुंखे, विजय साळुंखे, शाहरुख तडवी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.



