कामगार निरीक्षकाला ३६ हजारांची लाच घेतांना रंगेहात पकडले

0
58

साईमत / प्रतिनिधी / जळगाव

तक्रारदार यांना मुकादम पदावरून स्थगिती दिल्यानंतर त्याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त येथे सुनावणी सुरू असतांना निकाल लावण्यासाठी लावून देतो असे सांगून ५० हजारांची मागणी करत तडजोडीअंत ३६ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाच्या कामगार निरीक्षकाला जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, तक्रारदार हे जळगाव शहरातील रहिवाशी आहेत. ते माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष तथा मुकादम म्हणून करत होते. तक्रारदार यांना मुकादम पदावरून स्थगिती देण्यात आली होती. याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे सुनावणी सुरू आहे. दरम्यान या सुनावणीचा निकाल लावण्यासाठी कामगार निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी सदर सुनावणीचा निकाल सहाय्यक कामगार आयुक्त यांना सांगून लावून देतो असे सांगत तक्रारदार यांना ५० हजारांची लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे ५ ऑगस्ट रोजी तक्रार दिली होती.

या तक्रारीची पडताळणीसाठी गुरुवार ८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता सापळा रचला. त्यावेळी कामगार निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी तडजोडी अंती ३६ हजारांची लाच घेतांना पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी चंद्रकांत पाटील ( वय-५७, रा. जळगाव ) यांच्या विरुध्द जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पर्यवेक्षक अधिकारी पोलिस उप अधीक्षक सुहास देशमुख, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पो.नि.एन.एन.जाधव,पीएसआय दिनेशसिंग पाटील,पो.हे.कॉ. सुरेश पाटील,पो.हे.कॉ.रविंद्र घुगे,म.पो.हे.कॉ.शैला धनगर, पो.ना.बाळू मराठे,पो.कॉ.प्रणेश ठाकूर, पोना.किशोर महाजन,पो.ना. सुनिल वानखेडे,पो.कॉ.प्रदीप पोळ,पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी,पो.कॉ. सचिन चाटे यांनी कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here