साईमत / जळगाव / विशेष प्रतिनिधी
जन्मताः दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या रुग्णांसाठी प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ.शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आस्था प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल व रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या वतीने राज्यभर जिल्हास्तरीय शिबिर आयोजित करून अशा रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
याबाबतची घोषणा आज मंगळवार,6 ऑगस्ट रोजी घेतलेल्या पत्रकार परिषद करण्यात आली.द स्माईल ट्रेन या संस्थेच्या माध्यमातून आस्था प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल व रेड स्वस्तिक सोसायटीच्या वतीने 11 हजार 500 दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या राज्यातील व परराज्यातील रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करून त्यांना सौंदर्य व समाजात सन्मानाचं स्थान देण्याचं करण्यात आले आहे.अशी माहिती रेड स्वस्तिकचे राज्य सचिव अशोक शिंदे व डॉ.शिरीष चौधरी यांनी दिली.
दुभंगलेले ओठ व टाळू रुग्णांसाठी पुन्हा अगदी मोफत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर तसेच आदिवासी परिसरात शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात येणार आहे.ज्यांना अशा रुग्णांच्या संदर्भात माहिती असेल त्यांनी आस्था हॉस्पिटल व रेड स्वस्तिक सोसायटीकडे संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आली.
पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष डॉ.धनंजय बेंद्रे,कार्याध्यक्ष जे.बी.पाटील,जिल्हा सचिव डॉ.गणेश पाटील यांच्यासाह नरेश चौधरी,शरदभाऊ पांडे, शेखर पाटील,डॉ.प्रमोद आमोदकर,दीप पाटील, एस.एस.पाटील,नंदूभाऊ रायगडे,संजय आवटे,संजय काळे,राजू कामदार आदींची उपस्थित होते.
❝ रेड स्वस्तिकच्या सोबत गरीब,उपेक्षित, कोणत्याही योजनेत नसलेल्या दुभंगलेले ओठ व टाळू रुग्णांसाठी मोफत तपासणी व शस्त्रक्रिया सेवा कार्याला आणखी प्रभावी व अखंडित चालवणार आहोत.❞
– डॉ.शिरीष चौधरी, आस्था हॉस्पिटल,जळगाव.