साईमत / जळगाव / प्रतिनिधी
मानराज पार्क हुंडाई शोरुम शेजारील रस्ता पिंप्राळा परिसरात जाण्यासाठी सोयीचा आहे. म्हणून हा रस्ता सुरु करण्यासाठी कायदेशीर लढ्यातून या रस्त्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र रस्त्याचे पक्के बांधकाम करण्याच्या उद्देशाने हा सिमेंट कॉक्रीटचा बनविण्यास सुरवात करण्यात आली होती. मग मध्येच कुठ माशी शिंकली कि हा रस्ता अर्धवट सोडून काम बंद करण्यात आले आहे. या रस्त्याच्या काम बंद करण्यामागे कोण झारीतील शुक्राचार्य आहे असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला असून प्रशासनाने या रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे अशी मागणी सुज्ञ नागरिकांनमधून होत आहे.
मानराज पार्क हुंडाई शोरुम ची बाजूचा रस्ता पिंप्राळा पर्साराला जोडतो या गल्लीमध्ये हुंडाई शोरुमचे गोडाऊन आहे. हा रस्ता अगोदर बंद होता. कायदेशीर लढ्यातून हा रस्त्यालगतची माहामार्गाची भिंत तोडली गेली व रस्ता शासकीय नियमाने चालु झाला. दरम्यान , जळगाव शहरात रस्ते बनवणे चालु आहे. त्याचप्रमाणे हा रस्ताही सिमेंट कॉक्रीटचा बनवण्यास सुरुवात झाली होती मात्र, हा रस्ता अर्धवट सोडून दिला आहे. दिसताना असे दिसते संबधित प्रशासनाने हा रस्ता अर्धवट सोडून दिला आहे.
पण याबाबत अशी चर्चा रंगली आहे की, सदर अर्धवट सोडलेला रस्ता हा या परिसरातीलच काही झारीतील शुक्राचार्यांची करामत आहे. कारण हा रस्ता फक्त या रस्त्यावरील राहिवासी यांच्याच मालकीचा आहे. असा समाज त्यांचा आहे. कारण या रस्त्यावरून बाईक, सायकल, चार चाकी वाहन जाऊ शकत नाही. अश्याच अवस्थेत हा रस्ता अर्धवट सोडलेला आहे.
या प्रकरणी सबंधीत प्रशासनाने लक्ष घालून सदर रस्ता पूर्ण करून परिसरातील नागरिकांची समस्या दूर करावी अशी मागणी होत आहे.