पाळधीत महिला बचत गटांच्या मेळाव्यात मंत्री ना. गिरीष महाजन यांचे प्रतिपादन
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
केंद्र आणि राज्य सरकार यांच्या विविध लोककल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देऊन महिला, शेतकरी, विद्यार्थी व समाजातील प्रत्येक घटकांसाठी केंद्र आणि महायुती सरकार सर्वांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. तालुक्यातील पाळधी येथील माळी समाज मंगल कार्यालयात आयोजित महिला बचत गटांच्या भव्य मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, पं.स.चे माजी सभापती तथा पाळधीच्या उपसरपंच नीता पाटील, सरपंच प्रशांत बाविस्कर, माजी सरपंच कमलाकर पाटील, भाजपा गटप्रमुख नाना पाटील, बचत गटाचे तालुका समन्वयक कैलास गोपाळ, तालुका व्यवस्थापक अनिल बडगुजर, बापू काळबैले, माजी सरपंच सोपान सोनवणे, दिगंबर माळी, ज्ञानेश्वर सोनवणे, राम पाटील, ग्रामपंचायत सदस्य देवचंद परदेशी, मनोज नेवे, अमित पाटील, सचिन पाटील, आसिफ पठाण, संदीप सुशीर, सुलतान तडवी, नाना सुशीर, विनोद कोळी, ईश्वर चोरडिया, योगेश सुशीर, विनोद शिंदे तसेच सुभाष परदेशी, योगेश परदेशी, विनोद पाटील, अतुल बाविस्कर, किरण बाविस्कर हर्षल पाटील, जयवंत माळी, लकी टेलर तसेच पाळधी येथील महिला बचत गटांच्या महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन कमलाकर पाटील तर आभार दिगंबर माळी यांनी मानले.