पाळधीला शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
साईमत/पाळधी ता. धरणगाव/प्रतिनिधी :
धरणगाव तालुक्यातील गंगापुरी, पष्टाणे, अंजनविहिरे येथील शंभरहून अधिक तरुणांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. विरोधकांच्या टीकेला आम्ही नेहमी विकास कामांच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. पुढेही टीकेला उत्तर कामांतून देणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते पाळधी येथे भिल्ल समाजाच्या व इतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या शिवसेना प्रवेशावेळी बोलत होते.
जातीपातीच्या राजकारणापेक्षा विकास कामाचा वसा जोपासणाऱ्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही शिवसेनेत प्रवेश करीत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आगामी विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेसाठी खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
प्रमुख कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांना पक्षात आणण्याचा प्रयत्न केला सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे. त्याला तडा जाणार नाही. यातील बरेचसे कार्यकर्ते भिल्ल समाजाचे आहेत. ज्या गावात भिल्ल समाज आहे. तेथे एकलव्य यांची मूर्तीची स्थापना करण्याचा संकल्प केला आहे. तसेच पुढील काळातही शिवसेनेच्या ध्येय धोरणानुसार ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना, संजय गांधी निराधार व विविध सामाजिक उपक्रम राबवून सर्व सामान्यांना न्याय देण्यासाठी कार्यकर्ते कटिबद्ध असल्याचेही गुलाबराव पाटील म्हणाले.
यांची लाभली उपस्थिती
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील, शिवराज पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, तालुका संघटक रवींद्र चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, दूध संघाचे संचालक रमेश आप्पा पाटील, शेतकी संघाचे संचालक जितेंद्र पाटील, रोहिदास चव्हाण, युवासेनेचे आबा माळी, दीपक भदाने यांच्यासह गंगापुरी, पष्टाणे, अंजनविहिरे येथील शिवसेना युवा सेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन तथा प्रास्ताविक माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे तर आभार माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी मानले.