चोपडा विधानसभेची जागा काँग्रेसला मिळावी

0
116

पक्षाच्या ब्लॉकस्तरीय बैठकीत कार्यकर्त्यांची आग्रही भूमिका

साईमत/न्यूज नेटवर्क/चोपडा :

चोपडा तालुका आणि शहर काँग्रेस (आय) कमिटीच्यावतीने सोमवारी, २९ जुलै रोजी सकाळी ९ वाजता कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात पक्षाचे ध्वजारोहण, मासिक सभा तसेच प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशाने ब्लॉकस्तरीय बैठक आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील होते. बैठकीत चोपडा विधानसभेच्या जागेबाबत सखोल चर्चा करण्यात आली. त्यात कार्यकर्त्यांनी ही जागा काँग्रेस पक्षालाच मिळावी, अशी आग्रही भूमिका ॲड. संदीप पाटील यांच्याकडे मांडून जागा निवडूनच आणू, असा चंग बांधला.

बैठकीत राजेंद्र पाटील, विक्रम पाटील, प्रदीप पाटील, डॉ.पराग पाटील, प्रमोद देवरे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात ॲड. संदीप पाटील म्हणाले की, आपल्या भावना नक्कीच वरिष्ठ पातळीवर कळवल्या जातील. परंतु पक्षाचे संघटन कार्यकर्त्यांनी जोमाने करुन कामाला लागावे, अशा सूचनाही केल्या. तसेच भाजप सरकार कशा पद्धतीने चुकीचे राजकारण करीत आहे. त्याची आपण जन माणसात प्रसिद्ध दिली पाहिजे, असेही सांगितले. सुत्रसंचालन नंदकिशोर सांगोरे तर आभार संजीव सोनवणे यांनी मानले.

बैठकीला यांची लाभली उपस्थिती

बैठकीला तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष माजी बाजार समितीचे सभापती सुरेश सिताराम पाटील, चोसाकाचे माजी चेअरमन डॉ.सुरेश शामराव पाटील, तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा माजी उपसभापती तथा शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे, माजी तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, अल्पसंख्यांकचे जिल्हाध्यक्ष हमीद शेख, मेडिकल सेलचे तालुकाध्यक्ष डॉ.पराग पाटील, चोपडा साखर कारखान्याचे संचालक शिवाजी देसले, गोपाल नवल धनगर, शरद धनगर, सूतगिरणीचे संचालक देविदास सोनवणे, राजेंद्र पाटील, सुनील बागुले, जहीर भाई, वजाहत अली काझी, रमाकांत सोनवणे, प्रतापराव सोनवणे, विक्रम पाटील, शांताराम नाना लोहार, खैरनार भाऊसाहेब, संदीप देसले, एम.एन.शिंदे, सुनील पाटील, राजकुमार सोनवणे, प्रमोद देवरे, आत्माराम बळीराम पाटील, अशोक बबनराव सोनवणे, प्रल्हाद पाटील, शुभम देवरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here