विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्याचे ‘गणित ऑलिम्पियाड’ परीक्षेत यश
साईमत/न्यूज नेटवर्क/चोपडा :
येथील विवेकानंद विद्यालयातील इयत्ता चौथीचा विद्यार्थी भुवनेश्वर जगदीश कंखरे याने सीपीएस ‘गणित ऑलिम्पियाड’ परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले आहे. त्यामुळे `विमानातील सहल´ प्रवासासाठी त्याच्या आई-वडिलांसह त्याची निवड झाल्याने शनिवारी, २७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता ‘भुवनेश्वर’ त्याच्या आई-वडिलांसह इंदोर ते दिल्ली विमानप्रवास केला. दिल्ली दर्शन करून परतीचा प्रवास रेल्वे वातानुकूलित पूर्ण बोर्डचे आयोजन सीपीएस गणित ऑलिम्पियाड संस्थेतर्फे दिले जात आहे. ‘भुवनेश्वर’ला विवेकानंद विद्यालयातील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
त्याच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर, संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ.विजय पोतदार, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव ॲड.रवींद्र जैन, सहसचिव डॉ.विनीत हरताळकर, सर्व विश्वस्त, संस्थेचे विश्वस्त व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती आशा चित्ते, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य पी.जी.पाटील, इंग्लिश मीडियमच्या प्राचार्या सुरेखा मिस्त्री, बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका माधवी भावे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवृंद यांनी कौतुक केले.