सोनी नगरातील स्वयंभू महादेव मंदिराच्या परिसरात वृक्षारोपण

0
37

साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव

दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असल्याने निसर्गाचा समतोल ढासळत जात आहे. त्यामुळे वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन व्हावे, या हेतुने सोनी नगरातील जागृत स्वयंभू महादेव मंदिराच्या परिसरात रोटरी क्लब ऑफ वेस्ट जळगावतर्फे 30 वृक्षासह ट्री गार्डचे वाटप रविवारी, 28 जुलै रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आले. यावेळी माजी महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते वृक्ष लावून उद्घाटन करण्यात आले. सुरुवातीला जागृत स्वयंभू महादेवाची आरती मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.

वृक्षारोपणप्रसंगी रोटरी क्लब वेस्टचे ट्री गार्ड प्रोजेक्ट चेअरमन अंकित जैन यांनी मनोगत व्यक्त केले. वृक्षारोपणासाठी खड्डे करणारी मशिन संजय शाह यांच्याकडून मोफत उपलब्ध करून दिली होती. वृक्षारोपणासाठी परिसरातील युवा तसेच ज्येष्ठ नागरिकांसह महिलांनी परिश्रम घेतले.

वृक्षारोपण मोहिमेत यांनी घेतला सहभाग

मोहिमेत रोटरी क्लबचे व्हा.चेअरमन डॉ. ‌चेतन महाजन, सचिव बद्रेश शाह, खजिनदार स्मिता बंदुकवाला, अमित चांदीवाल, मुनीरा तरवारी, विकास अग्रवाल, महेश सोनी, अतुल कोगटा, अंकुर अग्रवाल, वैभव गोथी, संभाजी देसाई तसेच सोनी नगरातील रहिवासी नरेश बागडे, देविदास पाटील, सरदार राजपूत, मधुकर ठाकरे, विनोद निकम, निलेश जोशी, भैय्यासाहेब बोरसे, विजय चव्हाण, विलास दांडेकर, नारायण येवले, हेमराज गोयर, विकास काबरा, मुकुंद निकुंभ, विठ्ठल जाधव, भगतसिंग चावरीया, विजय भावसार, मिलिंद पाटील, निलेश जगताप, ओमकार जोशी, वेदांत बागडे, उमेश येवले, रामनिवास गुप्ता, घनश्याम बागुल, रविंद्र निंबाळकर, गणेश जाधव, अविनाश नेवे, महिला मंडळ माधुरी येवले, मनिषा चव्हाण, संगिता राजपूत, आशा बागडे, सोनाली जाधव, नंदिता जोशी, उषा बोरसे, लता दांडेकर, अनिता महाले, कल्याणी राजपूत यांच्यासह परिसरातील महिला, नागरिकांनी सहभाग घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here