भुसावळला दुकानदारांच्या बैठकीत राज्य उपाध्यक्ष भागवत पाटील यांनी केली घोषणा
साईमत/ न्यूज नेटवर्क/ भुसावळ :
येथील शामा मुखर्जी उद्यानात रविवारी, 28 जुलै रोजी अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार, केरोसीन परवानाधारक महासंघ, जळगाव जिल्हा भुसावळ तालुक्याची स्वस्त धान्य दुकानदारांची बैठक आयोजित केली होती. बैठकीत रावेर विभागाच्या भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, रावेर, यावल अध्यक्षपदी वरणगाव येथील संतोष माळी यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.
ही घोषणा अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डी.एन.पाटील, सचिव सुरेंद्र यादव, राज्य उपाध्यक्ष राजेश अंबुस्कर यांच्या आदेशाने ज्येष्ठ नेते भागवत पाटील यांनी केली. अध्यक्षस्थानी भागवत पाटील होते. बैठकीला जिल्हाध्यक्ष तुकाराम निकम, जिल्हा सचिव सुनील अंभोरे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख कैलास उपाध्याय, भुसावळचे तालुकाध्यक्ष महेंद्र सपकाळे, उपाध्यक्ष सी. आर. पाटील, शहराध्यक्ष आरिफ मिर्झा उपस्थित होते.
सर्व्हर डाऊनमुळे ई-पॉस मशीनला येताहेत अडचणी
स्वस्त धान्य दुकानात सध्या सर्व्हर डाऊन असल्यामुळे ई-पॉस मशीन चालत नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना धान्य वाटप करायला अडचणी निर्माण होत आहे. यासंदर्भात तहसीलदार नीता लबडे, जिल्हा पुरवठा अधिकारी यांना याबाबत निवेदन देऊनही समस्या लवकरात लवकर सोडविण्याची विनंती निवेदन देऊन केली असल्याचे तालुकाध्यक्ष महेंद्र सपकाळे यांनी प्रास्ताविकात सांगितले. तसेच जिल्हा सचिव सुनील अंभोरे, कैलास उपाध्याय यांनीही ई-पॉस मशीनमुळे विविध अडचणी निर्माण झाल्याचे सांगितले.
यांची लाभली उपस्थिती
बैठकीला तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार यशवंत बनसोडे, रहमान गवळी, ईश्वर पवार, पंकज पाटील, सुभाष पाटील विजय मेढे, अनिता आंबेकर टीना धांडे, लकी सुरवाडे, छाया बोंडे, शांताराम इंगळे, उल्हास भारसके, सुभाष चौधरी, भगवान वंजारी, अशोक प्रधान, संजय राजपूत, राजेश सैनी, नितीन जैन, रुपेश भोळे, भास्कर चौधरी, उमाकांत शर्मा, पराग वाणी, धीरज बऱ्हाटे, प्रतीक आंबेकर, मनोज घोडेस्वार, संतोष साळवे, शिवाजी पाटील, देविदास जोहरे, भगवान नन्नवरे यांच्यासह स्वस्त धान्य दुकानदार यांची उपस्थिती होती. शेवटी आभार सी. आर. पाटील यांनी मानले.