साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव
भारतीय मजदूर संघाच्या ७०व्या वर्षांत पदार्पणानिमीत्ताने जळगाव जिल्ह्यात विविध उद्योगात असंख्य कार्यक्रमांनी वर्धापनदिन साजरा करण्यात आला.
यावेळी कामगार मेळावा, घरेलू कामगारांना नोंदणी कार्ड वाटप, रक्तदान शिबिर-१०० श्रमिक रक्तदाते रक्तदान, स्वर्णिम-७० या उपक्रमाने ७० वृक्षरोपण,फलक व प्रतिमा पूजन,BMS-70 नावाचा केक कापुन व पेढे भरवून स्नेह भेट आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कामगार मेळाव्यामधे महिला भगिनी यांनी संघटनेचे ‘’मानवता के लिये उषा की,किरण जगाने वाले हम” गीत सामुहीकरित्या सादर केले. बांधकाम कामगार, घरेलू कामगार यांना शासनाच्या योजनांची माहिती देण्यात आली तसेच कामगारांना येणाऱ्या अडचणी संदर्भात चर्चा करण्यात आली.
प्रसंगी भा.म.संघ महाराष्ट्र प्रदेश सचिव वंदना कोलारकर यांनी मजदूर संघ कार्यकर्ता, कार्य व कार्यपध्दती तसेच कामगार शेत्रात भा.म.संघाचे योगदान व उपलब्धी या विषयी मार्गदर्शन केले.
यावेळी प्रदेश सचिव प्रविण अमृतकर, जिल्हाध्याक्ष किरण पाटील, जिल्हा सचिव सचिन लाडवंजारी, सदाशिव सोनार, योगेश सूर्यवंशी, किशोर पवार, पंकज पाटील, प्रविण मिस्तरी, सुनील कोळी, वंदना पाटील, मंगला चौधरी, नारायण कुमावत, प्रविण शिरसाठ, सुधाकर शिंदे, ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



