साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव
विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल पूर्व प्राथमिक विभागात “रेड कलर डे” साजरा करण्यात आला.
शिक्षक व विद्यार्थी लाल रंगाच्या वेशात येऊन, विद्यार्थ्यांना लाल रंगाची ओळख करून देऊन. यावेळी टेबलावर सुंदर व आकर्षक लाल रंगाच्या वस्तू मांडण्यात आल्या व शिक्षकांनी सर्व वस्तूंचा परिचय करून दिला. त्याबद्दल माहिती सांगण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रमुख कमल सपकाळे होत्या. कार्यक्रमास मुख्याध्यापक प्रवीण सोनावणे, ज्येष्ठ शिक्षिका स्मिता राव उपस्थित होते.
