साईमत /न्यूज नेटवर्क / जळगाव
शहिद सैनिकांच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी राज्यात दि. 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात आपल्या जिल्ह्यात दि. 26 जुलै रोजी सकाळी 9 वाजता माजी सैनिक बहुउद्देशिय सभागृहात कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येईल.
कार्यक्रमात कारगिल युद्धात शहित झालेले अधिकारी, जवान यांच्या अवलंबितांना 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधुनत्यांचा सत्कार करण्यात येईल. तसेच जवान फाऊंडेशन जळगाव व रेड प्लस ब्लड बँक तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्ह्यातील रक्तदात्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन रक्तदान करावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सोपान कासार यांनी केले आहे.
