प.पू.जनार्दन महाराज म्हणाले, योगराज नव्हे ‘राजयोग’?

0
48

साईमत/ न्यूज नेटवर्क/ सावदा, ता. रावेर :

गुणवंतांच्या पाठीवर नेहमी कौतुकाची थाप ठेवण्यासाठी अग्रेसर राहणारे मुक्ताईनगर येथील योगराज फाउंडेशनचे अध्यक्ष तथा समाजसेवक विनोद नामदेव सोनवणे यांचे सामाजिक व एकूणच कार्य पाहता त्यांना राजयोग असल्याचे सुतोवाच करून अपयशाऐवजी यशाला पचविण्याची क्षमता माणसांनी ठेवली पाहिजे, अन्यथा भविष्यासाठी नुकसानदायक ठरते, असे मोलाचे मार्गदर्शन महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले. रावेर तालुक्यातील विविध परीक्षेत यशवंत ठरलेल्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी, १४ जुलै रोजी येथे योगराज फाउंडेशनच्यावतीने पार पडला.

यावेळी विशेष पाहुणे म्हणून फैजपूर सतपंथी मंदिराचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, सावदा येथील महानुभाव पंथाचे मानेकर बाबा, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री किशोरी शहाणे व ‘झी मराठी’ टिव्हीवरील ‘हास्यसम्राट’ भारत गणेशपुरे यांच्या विशेष उपस्थितीत थाटात पार पडला. सर्वसमावेशक कौतुक सोहळ्यात सावदा व परिसरातील मराठी, इंग्रजी व उर्दू शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांसह पत्रकारीता क्षेत्रात योगदान देणाऱ्या पत्रकारांचाही सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

युवा उद्योजक विनोद सोनवणे यांचा सत्कार

सोहळ्यात सावदा परिसर पत्रकारसंघ आणि मुस्लिम समाजातर्फे युवा उद्योजक विनोद सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रमोद सोनवणे, संदीप पाटील, रवींद्र महाजन, जगदीश निकम, विक्की मराठे आदींनी परिश्रम घेतले.

यशस्वी सत्कारार्थी विद्यार्थ्यांमध्ये यांचा समावेश

इयत्ता बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये पूजा कोळी, नेहा महाजन, तृप्ती पाटील, संजना महाजन (खिर्डी), दुर्वा महाजन, भावेश भारंबे, निकिता पाटील, हर्षदा पाटील, यास्मिनबी शहा फकीर, भारती चौधरी (सावदा), वेदिका पाटील, विभुती पाटील, दिव्या महाजन (ऐनपूर), भाग्यश्री तायडे, चेताली ब्राम्हंदे, रोहित सपकाळे (थोरगव्हाण), वेदिका वाघ, तेजस्विनी चित्ते, दिशा वाघ (तांदलवाडी), प्रांजल सोनवणे, निलेखा चौधरी, किरण तायडे, आचल कोळी, पूनम शिरसाड, दीक्षा वानखेडे (मोठे वाघोदे) यांचा समावेश होता.

दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये धनश्री पाटील, पल्लवी फालक, भावना पाटील (खिर्डी), मुस्कानबी कलीम, ज्ञानेश्वर उंबरकर, निजमा इरफान (निंबोल), कुंजल नेमाडे, चेतन महाजन, इशान पाटील (सावदा), खुशी मानकर, दिशा पवार, आयुष ठाकूर (मोठे वाघोदे), नेहा सपकाळे, पार्थ पाटील, जागृती कोळी (मस्कावद), कृतिका सोनवणे, हर्षाली कंखरे, आयुष सोंडे (उदळी), दर्शिका महाजन, यश सपकाळे, वैष्णवी महाजन (तांदलवाडी), शैलजा पाटील, महेश तडवी, तुशांत भिरूड (खिर्डी बु.), अम्माराबी शेख जावेद, अरविनाबी शेख गुलाब, नजहतबी शेख आबिद (खिर्डी), प्रदुम्न वाणी, अमितोदन तायडे, भावेश पाटील, प्रतीक चौधरी (सावदा), सिध्दी चौधरी, संयोगिता महाजन, अंतरा पाटील (बलवाडी), अनुष्का पाटील, चैताली पाटील, दिव्यानी पाटील (पुरी – गोलवाडे), दिव्या पाटील, समृध्दी मेढे, अनुष्का पाटील (धामोडी), हर्षदा भोई, आरती पाटील, देवयानी भोई (रायपूर), तन्मयी लासूरकर, ज्ञानेश्वरी नेमाडे, धारा भिरूड (सावदा), बुशरा कौसर शेख सुपडू, रोझमीनबी शेख साबीर, मोहम्मद उमदर काशिक कमालउद्दीन (सावदा), तिलोत्तमा बाऊस्कर, सिद्धी पाटील, लोकेश कोळी (थोरगण), तनुश्री महाजन, सिद्धी पाटील, भूमिका पाटील (रावेर), प्राची बऱ्हाटे, वृषाली राणे, कोमल भंगाळे (सावदा) यांचा सत्कारार्थींमध्ये समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here