साईमत/ न्यूज नेटवर्क/ जामनेर :
विद्यार्थ्यांनी ध्येय, परिश्रम आणि चिकाटी या त्रिसुत्रीद्वारे शिक्षणाच्या माध्यमातून सर्वांग सुंदर विकास साधावा. त्यामुळे समाजासह देशाची सेवा करता येईल. हे करत असताना आई-वडील व गुरु यांच्या संस्कारावर आपले विचार मार्गक्रमित करावे आणि संस्कारशील भारताचा सक्षम नागरिक होऊन दाखवावे, असा उद्बोधनपूर्वक उपदेश चैतन्य धाम तथा गुरुदेव सेवाश्रमाचे संस्थापक-अध्यक्ष प.पू. श्याम चैतन्य महाराज यांनी केला. तालुक्यातील लिहा येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे वाटपप्रसंगी ते बोलत होते. विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप झाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले होते.
यावेळी वसंतराव नाईक अधिकारी, कर्मचारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल जाधव, तालुकाध्यक्ष बन्सीलाल चव्हाण, गोकुळ महाराज, दीपक चव्हाण, शाळेचे मुख्याध्यापक सुखदेव चव्हाण तसेच प्रगती कपाटे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य संदीप चव्हाण, संजय चव्हाण, विकार राठोड, ज्ञानेश्वर पवार यांच्यासह ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.