पत्रकारांतर्फे आदिवासी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

0
45

साईमत/ न्यूज नेटवर्क/जामनेर :

येथील गोविंद महाराज नगरातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील गरजू आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पत्रकार बांधवांतर्फे शैक्षणिक साहित्याचे नुकतेच वाटप करण्यात आले. यावेळी गरजू विद्यार्थ्यांना जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, जामनेर न.प.चे माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, जिकरा शिक्षण संस्थेचे सचिव जाकीर शेख यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी पत्रकार सुनील इंगळे, अनिल शिरसाठ, नितीन इंगळे, देविदास विसपुते, किरण चौधरी, सागर लव्हाळे, बबलु शेख, इम्रान खान, ईश्वर चौधरी, सुनील सुरवाडे, मनोज दुबे तसेच केंद्र प्रमुख संगिता पालवे, शाळेचे मुख्याध्यापक अनंत अरतकर, खेमराज नाईक यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

प्रत्येक महिलांनी ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

आपणही समाजाचे काही देणे लागतो, या उदात्त भावनेतून जामनेर येथील पत्रकार बांधवांनी एकत्र येत आज विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले, ही उल्लेखनीय बाब असल्याचे मनोगत महेंद्र (नाना) बाविस्कर यांनी व्यक्त केले. तसेच राज्य शासनाच्यावतीने “ मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना” संदर्भात राज्याचे ग्रामविकास मंत्री.गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यासह शहरात अनेक भागात महिलांना अर्ज भरण्यासाठी पथक नेमण्यात आले आहे. योजनेचा लाभ प्रत्येक महिलांनी घ्यावा, असे आवाहन महेंद्र बाविस्कर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here