साईमत/ न्यूज नेटवर्क/रावेर :
शहरातून बऱ्हाणपूर रस्त्यावरुन सार्वजनिक ठिकाणी एक दुचाकी चोरीच्या गुन्ह्याप्रकरणी रावेर पोलीस स्टेशनने संशयित आरोपीला अटक केली होती. त्याच्याकडून चोरीच्या नऊ दुचाकी मोटारसायकल जप्त केल्या आहेत. दरम्यान, याप्रकरणी आरोपीला रावेर न्यायालयात हजर केल्यावर त्याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
रावेर तालुक्यातील तामसवाडी येथील बंडू प्रभाकर महाजन (वय ४५) यांची दुचाकी चोरीस गेली होती. त्यानंतर त्यांनी रावेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती. त्यानुसार रावेर पोलीस स्टेशनला ५ जुलै रोजी गुन्हा दाखल झाला होता. गोपनीय माहितीनुसार भुसावळ तालुक्यातील वरणगावातून रामपेठ परिसरातून संशयित आरोपी जितेंद्र नारायण सोनवणे (वय ३२) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीस गेलेल्या रावेर फैजपूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेल्या गुन्ह्यातील नऊ दुचाकी मोटारसायकल काढून दिल्या आहेत.
यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस उपनिरीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधिक्षक अन्नपूर्णा सिंह, पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकातील नाईक सुरेश मेढे, पो.कॉ.सचिन घुगे, विशाल पाटील, महेश मोगरे, प्रमोद पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.