शिक्षणापासून विद्यार्थ्यांना वंचित राहू न देण्यासाठी प्रयत्नशील

0
30

साईमत/ न्यूज नेटवर्क/चाळीसगाव :

चाळीसगाव शहरासह तालुक्याला विकासाच्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करत आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने जनतेची कामे करत आहे. तालुक्यातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. त्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन आ.मंगेश चव्हाण यांनी केले. शहरातील पवारवाडी स्थित विठ्ठल-रुख्मिणी मंदिराच्या सभागृहात नगरपरिषदेच्या मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना रयत सेनेच्यावतीने सोमवारी, ८ जुलै रोजी मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन आ.मंगेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला पं. स.चे माजी सभापती संजय पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष नितीन पाटील, डॉ.संदीप देशमुख, शिवसेनेचे तालुका प्रमुख राहुल पाटील, उद्योजक संदीप जैन, पॉप्युलर मेडिकलचे संचालक प्रदीप देशमुख, ॲड.राहुल जाधव, रयत महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा प्रा.डॉ.साधना निकम, खडकी बु.चे पोलीस पाटील विनायक मांडोळे, शाहू मराठा संपादक प्रशांत गायकवाड, रयत भ्रष्टाचार निर्मूलनचे अध्यक्ष खुशाल पाटील, तरवाडे ग्रा.पं.चे मा.उपसरपंच नाना शिंदे, विठ्ठल-रुख्मिणी संस्थानचे भिकन पवार, बाळू पवार, दीपक राजपूत, योगेश गव्हाणे, सचिन स्वार, अमोल मराठे, हर्षल चौधरी, सागर सूर्यवंशी, कपिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आणि नगर परिषद शाळेचा विकास करण्याचा मानस आहे. त्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार आहे. तसेच समाजासाठी जे काही चांगले असेल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहील. रयत सेनेचे संस्थापक-अध्यक्ष गणेश पवार आणि त्यांचे सहकारी चांगले उपक्रम राबवित असल्याने त्यांचेही आ.चव्हाण यांनी कौतुक केले.

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी नगरपरिषद शाळा क्र.१ व ४, ७,१६ मराठी शाळेचे शिक्षक अनिल पेठे, राहुल परोसी, नितीन राठोड, उमेश राजपूत, कैलास पाटील, राखी ठोके, शितल गवळे, प्रदेश समन्वयक पी.एन.पाटील, प्रदेश सचिव प्रमोद वाघ, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, अनिल कोल्हे, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, विलास मराठे, शहराध्यक्ष छोटू अहिरे, कार्याध्यक्ष प्रदीप मराठे, संघटक शिवाजी गवळी, मार्गदर्शक राजेंद्र पाटील, सहसंघटक दीपक देशमुख, आडगावचे शाखाध्यक्ष राजेंद्र पाटील, विलास पाटील उपस्थित होते.

यांनी घेतले परिश्रम

यशस्वीतेसाठी स्वप्निल गायकवाड, सुनील पवार, दिलीप पवार, भूषण पाटील, अनिल कोल्हे, मुकुंद पवार, प्रशांत अजबे, नामदेव कुमावत यांनी परिश्रम घेतले.प्रास्ताविक रयत सेनेचे संस्थापक-अध्यक्ष गणेश पवार, सूत्रसंचालन सचिन नागमोती तर आभार प्रदीप मराठे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here