साईमत/ न्यूज नेटवर्क/ फैजपूर :
जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाचा पाया रचणारे, तापी परिसराला सुजलाम्-सुफलाम् करणारे नेतृत्व लोकसेवक बाळासाहेब स्व.मधुकरराव चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी, ७ जुलै रोजी खिरोदा येथे कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. सोहळ्यात कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्र शासन, महसूल विभाग, पोलीस यंत्रणा यांनी आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र जनतेसाठी काम केले. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी स्व.मधुकरराव चौधरी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत मनोगत व्यक्त केले. सुरुवातीला स्व.मधुकरराव चौधरी यांना मान्यवरांच्या हस्ते श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कार्यक्रमानिमित्त व्यक्त केलेल्या भावनांची चित्रफित दाखविण्यात आली. शिक्षण क्षेत्रात पहिली श्वेतपत्रिका काढणारे मंत्री. त्यांच्या श्वेतपत्रिकेतील अक्षरांवर कित्ता गिरवित राजकारणाचे धडे मिळाल्याने मधुकररावांची कृतज्ञता खूप महत्त्वाची असल्याचे सांगितले.
समाजात हुडकून अशी माणसे मिळणार नाहीत. ऐतिहासिक कामगिरी करण्यासाठी रक्ताचा, विचारांचा वारसा असेल. प्रगल्भ व मोठा वारसा शिरीष चौधरींनी वाहून आणला. काँग्रेसच्या विचारांचा वारसा या भुमीतून महाराष्ट्रात जावा. लोकांच्या अपेक्षा युवकांकडून खुप आहेत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावयाचे असल्याचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.
लोकसेवेची व लोककल्याणाचा वारसा घेऊन जाणारे पाहूणे, औषधोपचार नसतांना शासनाच्या घटक असलेल्या मंत्री महोदयांनी जनतेला धीर दिला. कृतज्ञता पूर्ण जीवन जगतांना ती व्यक्त करणे हा समाजिक संसार समाजापर्यंत पोहोचविण्याची गरज. लोकहितकारी राज्य राज्यात येवो, अशी अपेक्षा आ.शिरीष चौधरी यांनी व्यक्त केली.
राजकारणात निर्माण केला आदर्श
आपण १३ दिवस घरी बसणार का? या पवार साहेबांच्या शब्दात कर्तव्याशी जागण्याचा मंत्र पवार साहेबांनी दिला. महत्त्वाची राजकीय शक्ती निर्माण झाली तर ती समाजासाठी वापरणे गरजेचे आहे. लोकांमध्ये राहिले तर लोकात. सकारात्मकता व आत्मविश्वास असला तर आजच्या गढूळ समाजकारण व राजकारणात आदर्श राजकारणाची विचारधारा पुढे घेऊन जायचे काम करायचे आहे, माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
शिक्षणमंत्री म्हणून कामाची इतिहासात नोंद
बाळासाहेब चौधरी यांनी शिक्षणमंत्री म्हणून केलेले काम इतिहासात नोंद घेणारी ठरली आहे. विधानसभा शिस्तबद्ध पद्धतीने चालविण्याचा वारसा त्यांनी टिकवून ठेवला. शिक्षण, राजकारण व समाजकारणाचा वसा व वारसा शिरीषदादा चौधरींनी आपल्या राजकीय जीवनात अंगीकारला. आता पुढे त्यांचे सुपुत्र धनंजय चौधरी हा आपला भावी आमदार उदयास येणार असल्याचे मनोगत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
स्व.मधुकरराव चौधरींची शिक्षणमंत्री म्हणून महाराष्ट्राला ओळख आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी प्रभावी काम केले असल्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.जगदीश पाटील, सुरेश पाटील तर आभार ज्ञानेश्वर बढे यांनी मानले.