साईमत/ न्यूज नेटवर्क/ खिडी, ता.रावेर :
रावेर ताुक्यातील खिर्डी ते निंभोरा रस्त्यावरील असलेले खड्डे दिवसेंदिवस अपघाताला निमंत्रण देत आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेकवेळा वाहनधारकांचे खड्डे चुकवितांना अपघात झाले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांवरील खड्डे बुजवावे, अशी मागणी परिसरातून होत आहे.
खिर्डी येथील एकाचा खिर्डी ते निंभोरा दरम्यान उड्डाणपुलाच्या आधी असलेल्या खड्ड्यांमुळे ५ रोजी गाडीचा टायर सरकल्याने अपघात झाला होता. सुदैवाने, त्यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र, याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग कानाडोळा करतांना दिसत आहे. तसेच निंभोरा खिर्डी दरम्यान असलेल्या खिर्डी ते निंभोरा जातांना उड्डाणपुलाच्या सुरुवातीला उड्डाणपुलाच्या ठेकेदाराने रस्त्यावरील एक खटका किंवा गतिरोधकसारखे जॉइंट ठेवले आहे. ज्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक वाहनधारकांच्या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे.
