साईमत/ न्यूज नेटवर्क/मलकापूर :
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता वेगळे आरक्षण देण्यात यावे, यासाठी सोमवारी, १ जुलै रोजी मलकापूर उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब दामोदर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मराठ्यांना ओबीसीमधुन आरक्षण देऊ नये. कारण ओबीसीमध्येच जास्त लोकसंख्या आहे. त्यातच मराठ्यांना त्यांच्यात समाविष्ट करु नये. तसेच संगे सोयऱ्यांची अंमलबजावणी करु नये. त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. जर मराठ्यांना सरकार ओबीसीमध्ये आरक्षण दिल्यास ओबीसीवर हा अन्याय होईल, असे झाल्यास बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाप्रमाणे वंचित बहुजन आघाडी व ओबीसी आरक्षण बचाव समिती तसेच बारा बलुतेदार संघटना लोकशाही पद्धतीने आंदोलन करु, असेही निवेदनात नमूद केले आहे.
निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब दामोदर, यशवंत कळासने, तुळशीराम वाघ, ॲड. सदानंद ब्राह्मणे, भगवान इंगळे, जगन गवई, विलास तायडे, सुनील इंगळे, वासुदेव वाघ, लक्ष्मण इंगळे, रवीकर तायडे, त्र्यंबक तायडे, सिताराम तायडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.