साईमत/ न्यूज नेटवर्क । जामनेर।
येथील पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना जामनेर शहरात गुटखा येत असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती. तेव्हा त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन जळगाव रस्त्यालगतच्या मराठा मंगल कार्यालयाजवळ सापळा लावून जामनेरमध्ये चार लाखांचा गुटखा पकडला आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस नाईक चंद्रकांत समाधान चिकटे यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर गाडी (क्र. एमएच १९ ३७७१) पाठलाग करून गाडीची झाडाझडती घेतली होती. तेव्हा त्यात १० पोते व १० गोण्या गुटखा आणि सुगंधित तंबाखू असल्याचे दिसून आले. त्यांची किंमत ४ लाख रुपये आणि स्विप्ट कारची किंमत ४ लाख असा ८ लाख २९ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कार चालक पवन मोहन गोसावी (रा. मुक्ताईनगर) यास ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर काळे, निलेश घुगे, तुषार पाटील, अमोल पाटील, संजय खंडारे, होमगार्ड दीपक खंडारे यांच्या पथकाने केली.