साईमत/ न्यूज नेटवर्क । चाळीसगाव ।
सोन्या मारुती मंदिर ते नवीन नाका हिरापूर रस्त्यापर्यंत नवीन रस्त्याचे वर्क आर्डर झाल्यानंतरही तीन महिने होऊनही रस्त्याचे काम सुरू होत नव्हते. रयत सेनेने सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे रस्त्याचे काम आठ दिवसात करण्याची मागणी केली होती. मागणीची दखल घेत २७ जूनपासून सार्वजनिक बांधकाम उपविभागाने रस्त्याचे काम सुरू केले आहे. रस्त्याचे काम सुरू झाल्याने रयत सेनेने केलेल्या मागणीला यश आले आहे.
प्रभाग क्र.९ मध्ये मलनिस्सारण योजनेचे (भुयारी गटार) काम होऊन सहा महिने झाल्यानंतरही वर्क ऑर्डर होऊनही सोन्या मारुती मंदिर ते नवीन नाका हिरापूर रस्त्यापर्यंत नवीन रस्त्याचे काम चाळीसगाव सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्यावतीने केले जात नव्हते. या रस्त्यावरून जवळपास २० ते २५ गावाच्या लोकांसह प्रभाग ९ व हिरापूर रोड परिसरातील लोकांची रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्यान रस्त्याने मोठी वर्दळ असते. रस्ता खराब असल्याने रस्त्यावरून वाहने व पायी चालणे जिकरीचे झाले होते. गेल्या ६ महिन्यांपासून रस्त्याचे काम रखडल्याने रयत सेनेकडे अनेक नागरिकांनी रस्ता होण्यासाठी आपण पाठपुरावा करण्याचे सांगितल्याने रयत सेनेने मागणी करून पाठपुरावा केल्यानंतर २७ जून पासून रस्त्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून जाणे सोयीचे होणार असल्यामुळे नागरिकांनी रयत सेनेचे आभार मानले आहे.
आ.मंगेश चव्हाण यांचे मानले आभार
प्रभाग क्र.९ चे नगरसेवक चंद्रकांत तायडे यांनीही रस्ता होण्यासाठी नगर परिषदेकडे पाठपुरावा सातत्याने केला आहे. सोन्या मारुती मंदिर ते नवीन नाका हिरापूर रस्त्यापर्यंत नवीन रस्त्याचे काम सुरू झाल्याने रयत सेनेने केलेल्या मागणीला यश आले आहे. आ मंगेश चव्हाण यांनी शहरातील रस्त्यांच्या कामासाठी मंजूर केलेल्या निधीतून रस्त्याचे कामे सुरू असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत आ.मंगेश चव्हाण यांचे आभार मानले आहेत.