Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»यावल न.पा.ने थकीत अनुदान केले लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा
    यावल

    यावल न.पा.ने थकीत अनुदान केले लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 26, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत/ न्यूज नेटवर्क । यावल ।

    येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरु असलेले घरकुलांचे थकीत हप्ते मार्च २०२४ पासून लाभार्थ्यांना मिळाले नव्हते. त्यामुळे ते लवकरात लवकर वितरित करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन यावल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले होते. त्याची तात्काळ दखल घेत नगरपरिषदेने लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थकीत हप्ते जमा केले आहेत.

    गेल्या काही महिन्यांपासून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थी अनुदानापासून वंचित होते. घरकुल याजनेचे बँक खाते बँक ऑफ महाराष्ट्र शाखा न्हावी, ता.यावल येथुन वितरित करण्यात येतात. पण बँकेच्या तांत्रिक अडचणींमुळे अनुदान रखडलेले होते. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा न्हावी यांच्याशी संपर्क करून लाभार्थ्यासह बँक समोर आंदोलन करु, असा इशारा अतुल पाटील यांनी गेल्या ७ जून २०२४ रोजी दिला होता. त्याची दखल घेऊन उशीरा का होईना लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा झाल्याने लाभार्थी आनंद व्यक्त करीत आहेत. यापुढे उर्वरित घरकुल योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी, अशी सूचना नगरपालिकेकडे केली आहे.

    आंदोलनाच्या इशाऱ्याची पालिकेने घेतली दखल

    यावल शहरात २०१९ पासून प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत आजतागायत ३५६ घरकुले मंजूर केली आहे. त्यापैकी २५२ घरकुले सुरु आहे तर १५५ घरकुल पूर्ण झाले आहेत. उर्वरित ९७ घरकुले सध्या सुरु आहेत. मात्र, घरकुल लाभार्थ्यांना मार्च २०२४ पासून ते आजपर्यंत थकीत हप्ते मिळाले नव्हते. घरकुल लाभार्थी हे सर्वसामान्य लोक आहेत. त्यांनी उसनवारी अथवा लोकांकडून पैसे घेऊन घराची कामे पूर्ण केली आहेत. म्हणून त्यांना लवकरात लवकर थकीत हप्ते वितरित करण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने यावल नगरपालिकेचे मुख्याधिकारी माकोडे यांनी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांना पत्र देऊन रखडलेले अनुदानाचे हप्ते लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहे. आपण आंदोलन करु नये, असे विनंती वजा लेखी पत्र पाटील यांना दिले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    “सत्तासंघर्ष थांबला! यावल नगरपरिषद समिती सभापती निवडीत ऐतिहासिक समझोता”

    January 19, 2026

    Yaval : शासनातर्फे देण्यात आलेला देय भत्ता स्वाभिमानी पोलीस अधिकारी

    January 17, 2026

    Yaval : ८ वर्षीय ओमने पार केले अडीच तासांत १७ किमी सागरी अंतर

    January 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.