अमळनेरात १ जुलैला कोळी समाजाचा बिऱ्हाड मोर्चासह ठिय्या आंदोलन

0
26

साईमत/ न्यूज नेटवर्क । अमळनेर ।

तालुक्यातील आदिवासी कोळी लोकांना टोकरेकोळीचे (एसटी) दाखले मिळाले पाहिजेत, यासाठी चोपडा व अमळनेर तालुक्यातील आदिवासी कोळी समाजबांधवांतर्फे सोमवारी, १ जुलै रोजी सकाळी ११ वाजेपासून अमळनेर येथील तिरंगा चौकापासून प्रांत कार्यालयापर्यंत भव्य बिऱ्हाड मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याच ठिकाणी बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. यापूर्वी येथील प्रांत कार्यालयातर्फे शेकडो जातप्रमाणपत्र दिलेले आहेत. मग आत्ताच का देत नाहीत? अशा आशयाचे निवेदन अमळनेरचे प्रांताधिकारी महादेव खेडकर यांना नुकतेच देण्यात आले.

निवेदनात प्रांत कार्यालयाकडे जातप्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज सादर करताना सबळ पुरावे जोडलेले आहेत. त्यांची दोन वेळेस तपासणी व सुनावणीही झालेली आहे. अशा प्रलंबित व नवीन दाखल होणाऱ्या प्रकरण धारकांना तात्काळ टोकरेकोळीचे दाखले मिळाले पाहिजेत. तसेच संबंधित विभागाने आंदोलनकर्त्यांच्या आरोग्यासह निवास, भोजन व शौचालयाची व्यवस्था करावी, असेही निवेदनात नमूद केलेले आहे. निवेदनाच्या प्रती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील, विद्यमान खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, माजी आमदार, तहसीलदार, पोलीस अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. निवेदनावर प्रमुख आंदोलनकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी अन्नत्याग सत्याग्रहाचे प्रणेते जगन्नाथ बाविस्कर (चोपडा), ज्येष्ठ समाजसेवक मधुकरगुरु सोनवणे (अमळनेर), चोपडा सुतगिरणीचे संचालक कैलास बाविस्कर यांच्यासह सामाजिक पदाधिकारी हिलाल सैंदाणे, रामचंद्र सपकाळे, गोपीचंद कोळी, सुकदेव सोनवणे, चंद्रशेखर सूर्यवंशी, प्रवीण कोळी, भूषण कोळी, हिरामण कोळी, गणेश बाविस्कर, शांताराम कोळी, रावसाहेब शिरसाठ, गोपाल देवराज, भीमराव कोळी, विशालराज बाविस्कर, अनिल कोळी, पांडुरंग कोळी, भीमराव सपकाळे, प्रेमकिरण कोळी, हिरामण कोळी, किरण शिरसाठ, पवन कोळी, गुणवंत साळवे, भगवान कोळी, चंद्रशेखर कोळी, रामचंद्र सोनवणे, सागर सोनवणे, विश्राम कोळी, लोटन कोळी, राजेंद्र लोहारे, चेतन कोळी, गणेश कोळी, वसंत कोळी, प्रदीप लोहारे, वासुदेव लोहारे, राकेश कोळी, विक्रम शिरसाठ यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here