अनैतिक संबंधाला अडसर ठरणाऱ्या पतीला धाडले ‘यमसदनी’

0
38

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील कोदगाव याठिकाणी पत्नीने प्रेम संबंधांमध्ये अडचण ठरलेल्या पतीचा ब्लेडने वार करून डोक्यात दगड टाकून निर्घृण खून करुन ‘यमसदनी’ धाडले आहे. त्यानंतर अपघात झाल्याचा बनाव केला. याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी कौशल्याने कट उघडकीस आणून मयताची पत्नी वंदना पवार आणि तिचा चुलत दीर गजानन पवार यांना पळून जाण्याची संधी न देता वंदनाला चाळीसगाव रेल्वे स्टेशनच्या परिसरातून तर गजानन पवारला न्यायडोंगरी येथुन ताब्यात घेऊन अटक केली आहे. दोघांनी खून केल्याची कबुली दिली असल्याचे सांगण्यात आले.

सविस्तर असे की, बाळू सिताराम पवार (वय ४०, रा. न्यायडोंगरी, ता. नांदगाव, जि. नाशिक) असे मयत तरुणाचे नाव आहे. पत्नी वंदना पवार यांच्या सोबत तो राहत होता. पती बाळू पवार हा वंदनास दारू पिऊन शिवीगाळ करून मारहाण करीत होता. अखेर पत्नी त्याच्या त्रासाला कंटाळून गेली होती. तिचे चुलत दीर गजानन राजेंद्र पवार यांच्या सोबत गेल्या दोन वर्षापासून अनैतिक संबंध होते. गेल्या अनेक महिन्यांपासून अनैतिक संबंधांमध्ये पती बाळू पवार हा अडथळा ठरत होता.

पत्नी अन्‌ दीराने रचला खुनाचा कट

प्रेमामध्ये अडचण ठरलेल्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नी वंदना व प्रियकर चुलत दीर गजानन यांच्यासोबत पतीला मारण्याचा कट रचण्यात आला. मंगळवारी, १८ रोजी चाळीसगाव येथे पती बाळू याला घेऊन आल्यावर बाळूला चुलत दीर गजानन याने दारू पाजली. सायंकाळी माहेरी जात असल्याचे सांगून कन्नड येथे जायचे आहे, असे पत्नी वंदनाने पती बाळूला सांगितले. बाळू याला गजानन यांच्या दुचाकीवर कोदगाव शिवारात नेले. त्यानंतर त्याठिकाणी पत्नी वंदना हिने बाळूच्या पोटावर ब्लेडने वार केले. त्यानंतर डोक्यात दगड टाकून पती बाळू याला ठार मारले. तसेच कोणाला संशय येऊ नये, म्हणून बाळू पवार याचा मृतदेह महामार्गावर नेऊन टाकून दिला. त्याच्या खिशात आधार कार्ड ठेवले. नंतर प्रियकर आणि प्रेयसी पत्नी दोघे तिथून पसार झाले होते.

घातपाताचा पोलिसांना संशय बळावला

बाळू पवार याच्या अंगावरील खुणांमुळे हा अपघात नसून घातपात असल्याचा पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी मयत बाळूच्या नातेवाईकांकडे विचारपूस केली. मयताची पत्नी वंदना हिच्याकडे फोनवरुन चौकशी केल्यावर तिच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली होती.

यांनी केली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्‍वर रेड्डी, चाळीसगाव परिमंडळाच्या अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर (पवार), चाळीसगाव उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली आरोपीतांनी गुन्ह्यात कोणताही पुरावा ठेवलेला नसताना चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, स.पो.नि. सागर ढिकले, पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, संदीप घुगे, सुभाष पाटील, पो.हे.कॉ. राहुल सोनवणे, योगेश बेलदार, विनोद भोई, पंढरीनाथ पवार, प्रवीण जाधव, अजय पाटील, पो.ना. महेंद्र पाटील, भूषण पाटील, दीपक पाटील, रवींद्र पाटील, तुकाराम चव्हाण, पो.कॉ.प्रकाश पाटील, शरद पाटील, नंदकुमार महाजन, विजय पाटील, निलेश पाटील, अमोल भोसले, विनोद खैरनार, आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्छे, राकेश महाजन, गोपाल पाटील, अमोल पाटील, समाधान पाटील, पवन पाटील, मनोज चव्हाण, ज्ञानेश्‍वर पाटोळे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पो.हे.कॉ. सुधाकर अंभोरे, पो.ना.लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, पो.कॉ. ईश्‍वर पाटील, महेश सोमवंशी तसेच सायबर पोलीस स्टेशनचे पो.कॉ. गौरव पाटील, मिलींद जाधव तसेच फॉरेन्सिक टीमचे पो.कॉ. हरीष परदेशी, शिवराज नाईक, प्रमोद ठाकूर अशांनी उघडकीस आणला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पो.हे.कॉ. विनोद भोई करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here