अमळनेर तालुक्यात सर्रास वृक्ष तोड

0
34

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

तालुक्यात सर्रास वृक्ष तोड सुरु असल्याचे चित्र आहे. मात्र, याकडे कुणीही लक्ष घालत नसल्याने वृक्ष तोडीवर आळा घालून कारवाईची मागणी वृक्षप्रेमींकडून होत आहे. दरम्यान, गुरुवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास अमळनेर निम रस्त्यावर पिंपऱ्या नाल्याजवळ लाकूड तोड करून लाकडांनी भरलेले दोन ट्रॅक्टर वाहतूक करण्यात आले आहे. यासंदर्भातही चौकशीची मागणी केली आहे.

दरवर्षी पावसाळा अत्यल्प होत चालला असताना दिवसेंदिवस सर्वत्र दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. बिनधास्त वृक्षतोड़ केली जात आहे. यावर्षी लवकर शेत शिवारातील कामे आटोपल्याने शेतात वृक्षतोड सुरु आहे. थोड्याशा पैसेकरिता शेतातील मध्यभागी व बांधावर उभे असलेले डेरेदार वृक्ष तोडले जात आहेत. परिणामी शेत शिवारात झाडांची संख्या खूपच कमी दिसून येत आहेत.

वृक्षतोड करणारी टोळी सक्रीय

परिसरात एक दिवस अगोदर येऊन वृक्षतोड करणाऱ्यांचे तालुक्यात सर्वत्र दलाल सक्रिय आहेत. या दलांलामार्फत परिसराची पाहणी करून गेल्यानंतर वृक्षतोड करणारी सात ते आठ जणांची ही टोळी अत्याधुनिक सामुग्रीच्या सहाय्याने डेरेदार वृक्षाला एका तासाभरात त्याचे लहान-लहान तुकडे करून त्याठिकाणी डेरेदार वृक्ष होता की नाही हेच कळत नाही.

रात्रीची चोरटी वाहतूक

दिवसा वृक्षतोड करून सायंकाळच्या सुमारास शेताच्या परिसरात वाहन घेऊन जात रात्री आठ ते दहा वाजेच्या सुमारास चोरटी वाहतूक करून लाकुड वाहतूक सुरु आहे. अत्याधुनिक अवजारांमुळे डेरेदार वृक्ष काही वेळेतच भुईगत आडवा पडून नष्ट केले जात असल्याने वृक्ष प्रेमींमधुन तीव्र संताप व्यक्त होत आहे. मात्र, याबाबत जबाबदार अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कारवाईची मागणी होत आहे. सर्वत्र वृक्षतोड सुरु असताना संबंधित अधिकारी झोपेचे सोंग घेऊन कानाडोळा करीत असल्याचा आरोप करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here