साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र शिक्षक पॅनलतर्फे (एमएसपी) वाडीलालभाऊ राठोड माध्यमिक आश्रमशाळेचे उपक्रमशिल शिक्षक तथा समृद्धी शिक्षक फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष सतीश साहेबराव सूर्यवंशी यांना मराठी चित्रपट अभिनेत्री किशोरी शहाणे, कविवर्य अनंत राऊत, एमएसपीचे अध्यक्ष दीपम जामे यांच्या हस्ते नुकताच नाशिक येथे राज्यस्तरीय सेवा सन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्या.तथा नंदुरबार येथील सरदार सरोवर प्रकल्प तक्रार प्राधिकरणाचे अध्यक्ष संगीतराव पाटील यांनी त्यांचा सपत्नीक सत्कार केला.
यावेळी न्या.संगीतराव पाटील, मिना पाटील, अशोक पाटील, अनिता पाटील, तेजस पाटील, सुनील पाटील, सुरेखा पाटील, उषाताई पाटील, लताबाई सूर्यवंशी, सुवर्णा सूर्यवंशी, सर्वश सूर्यवंशी, समृध्दी सूर्यवंशी उपस्थित होते.