साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
अखिल भारतीय माळी समाज महासंघाची जळगाव जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली. त्यात चाळीसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा डॉ.प्रमिलाताई पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश सोनवणे यांची सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम पाहता त्यांची अखिल भारतीय माळी समाज महासंघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. ही निवड राष्ट्रीय अध्यक्ष विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानुमते करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नूतन कार्यकारिणीत अध्यक्षपदी रमेश सोनवणे (चाळीसगाव), उपाध्यक्षपदी कैलास वेळू माळी (बोदवड), दिनेश रघुनाथ माळी (भडगाव), महेंद्र कृपाराम बाविस्कर (जामनेर), बापू तुकाराम महाजन (पारोळा), रवींद्र संतोष माळी (कोळगाव), शाम वसंत महाजन (यावल), गोरख सीताराम महाजन (पाचोरा), प्रकाश भिका महाजन (एरंडोल), सरचिटणीस हनुमंत मंगा महाजन (अडावद), दिनेश पुंडलिक तायडे (धरणगाव), भानुदास हिरालाल महाजन (कजगाव), चिटणीस सचिन शांताराम देशमुख (पारोळा), सुरेश सखाराम सोनवणे (तळई), संतोष ओंकार माळी (कळमसरे), सुरेश संतोष पाटील (अमळनेर), लक्ष्मीकांत विठोबा महाजन (वाघोळ), मुरलीधर नारायण महाजन (भुसावळ), संजय अमृत महाजन (जळगाव), रवींद्र लोटन माळी (अंबापिंप्री), गोपाल महाजन (एरंडोल), सुरेश पांडुरंग महाजन (जामनेर), संजय भाईलाल महाजन (मुक्ताईनगर), सह संघटक प्रदीप विठल गीते ( पिंपळगाव हरेश्वर), संजय विठल महाजन (रावेर), संघटक अशोक नथु नेरकर (जामनेर), दीपक संभाजी महाजन (पिचरडे), कर्मचारी आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश प्रकाश बोरसे (जवखेड), महिला शहराध्यक्ष पुष्पा गोकुळ महाजन (जळगाव), जिल्हाध्यक्ष जळगाव ग्रामीण सरिता अनंत नेरकर (जळगाव), पूर्वक जिल्हाध्यक्ष वासुदेव एकनाथ पाटील (चाळीसगाव), कायदेशीर सल्लागार अविनाश विश्वास जाधव (पातोंडा), तालुकाध्यक्ष चाळीसगाव काकासाहेब भीमराव माळी (पोहरे), सदस्यांत अरुण खुशाल माळी (चोपडा), दिनकर गंगाराम माळी (वरणगाव), सुनील बाबुराव माळी (सेलवड), पुंजू डिंगम्बर पाटील (यावल), मच्छिंद्र जीवन चौधरी (दहीगाव वसंत), विजय भास्कर महाजन (धरणगाव), लक्ष्मीकांत विठोबा महाजन (वाघोळ) यांचा समावेश आहे.



