Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अमळनेर»अमळनेरातील प्रभाग १ मध्ये वीजपुरवठ्याचा बट्ट्याबोळ
    अमळनेर

    अमळनेरातील प्रभाग १ मध्ये वीजपुरवठ्याचा बट्ट्याबोळ

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 22, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

    शहरातील प्रभाग १ मधील बंगाली फाईल, ज्ञानेश्‍वर कॉलनी, अयोध्या नगर, रामवाडी, केशव नगर व तांबेपुरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठ्याचा अक्षरशः बट्ट्याबोळ झाला आहे. वीज महावितरणच्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या खेळामुळे नागरिकांचा कधीही उद्रेक होणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी महावितरण कंपनीला दिला आहे.

    ४५ प्लस तापमानामुळे प्रचंड उकाडा त्यात ज्या दिवशी नळांना पाणी सोडले जाते त्याच दिवशी व त्याच वेळात वीज गुल होणे असे प्रकार महिन्याभरापासून होत आहे. २१ मे रोजी जवळपास दिवसभर वीज गुल झाल्याने या भागातील संतप्त झालेल्या नागरिकांनी महावितरण कंपनीसह माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांच्या घरावर मोर्चा नेऊन प्रचंड संताप व्यक्त केला.

    यासंदर्भात माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गेल्या महिन्याभरापासून अनियमित विजेमुळे नागरिकांचे होत असलेले हाल मी स्वतः त्या प्रभागाचा नागरिक म्हणून अनुभवत व सोसत आहे. त्यामुळे नागरिकांचा संताप होणे स्वाभाविक आहे. परंतु महावितरण कंपनी हा विषय सौम्य घेत असेल तर हा त्यांचा भ्रम आहे. त्यातून मोठा उद्रेक लवकरच पहायला मिळणार आहे. मी स्वतः यासंदर्भात अनेकदा वीज महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी करूनही कुणीच गांभीर्याने घेत नाही. ज्यादिवशी पालिकेकडून पाणी सोडले जाते, त्याच दिवशी व त्याच वेळात वीज गेली असल्यास आम्ही अधिकारी वर्गास फोन लावण्याचा प्रयत्न केला असता ते फोनही घेत नाहीत. म्हणजेच अधिकारी वर्ग हेतुपुरस्कर दुर्लक्ष करीत असतील तर हा विषय गंभीर आहे. आता नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाल्याने आम्हाला स्वतः रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय दिसत नाही.

    रस्त्यावर उतरण्याचा घेतला निर्णय

    प्रभाग १ हा परिसर मागासवर्गीय अथवा गोरगरीब व मोलमजुरी किंवा शेती व इतर ठिकाणी मेहनतीचे काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करणारा वर्ग आहे. त्यांना थकूनभागून कामावरून घरी आल्यानंतर विश्रांतीची अत्यंत आवश्‍यकता असते. नेमके याच गरजू लोकांना रणरणत्या उन्हात विजेविना ठेवले जात असेल तर हा त्यांच्यावर मोठा अन्याय आहे. आता या भागाचा लोकप्रतिनिधी नात्याने मी स्वतः रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यातून नागरिकांचा जो काही उद्रेक होईल त्यातून यात्रोत्सवाच्या काळात अमळनेर शहरात अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, यास आमचा नाईलाज असल्याने होणाऱ्या परिणामास वीज महावितरण कंपनी व कंपनीचे अधिकारीच जबाबदार राहतील, असेही नरेंद्र चौधरी यांनी पत्रात म्हटले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Amalner : अमळनेर गावात विवाहितेचा विनयभंग

    January 14, 2026

    Amalner : अमळनेरमध्ये दुचाकीवर जाताना मांजाने गळा कापला

    January 14, 2026

    Amalner:दहिवद ग्रामपंचायतीच्या वृक्षलागवडीची शास्त्रज्ञांकडून पाहणी

    December 29, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.