साईमत, जळगाव : प्रतिनिधी
शहरातील मेहरुण परिसरातील डॉ.सुनीलभाऊ महाजन ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी सेजल चंद्रशेखर अत्तरदे हिने नुकत्याच बारावीच्या परीक्षेत ८३.८३ टक्के गुण मिळवून कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
ती नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे, जि.प.सदस्या माधुरी अत्तरदे यांची कन्या आहे. तिच्या यशाबद्दल तिचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुनीलभाऊ महाजन यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.