अहमदाबादमधील मंदिरावर समाजकंटकांकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध

0
54

साईमत, फैजपूर : प्रतिनिधी

गुजरात राज्यातील अहमदाबाद कर्णावती जिल्ह्यात तीर्थधाम प्रेरणापीठ प्रेरणा, ता. दसकोई येथे समस्त सतपंथी अनुयायींचे आराध्य दैवत श्री निष्कलंक नारायण भगवान मंदिर व श्री हंसतेजजी महाराज यांची अखंड ज्योत प्रज्वलित आहे. हे ठिकाण भारतभरमध्ये असलेल्या सतपंथी व हिंदू बांधवांचे श्रद्धास्थान आहे. तीर्थधाम प्रेरणापीठ प्रेरणा येथे अचानक मंदिराची मागील भिंत व पत्रे तोडून हजारो धर्मांध समाजकंटकांनी मंदिरात घुसून हल्ला केला. समाजकंटकांनी येथील हिंदू देवतांच्या मुर्त्या व मंदिराचे तोडफोड करून उपस्थित हिंदू बांधवांवर जीवघेणा हल्ला केला. तसेच मोठ्या प्रमाणावर दगड व विटांचा मारा मंदिर परिसरावर व तेथील हिंदू कुटुंबांवर करण्यात आला. सर्व प्रकार धार्मिक तेढ निर्माण कणारा व निंदनीय आहे.अशा धर्मांध व आक्रमक समाजकंटकांवर लवकरात लवकर कारवाई करून न्याय मिळावा, यासाठी जळगाव जिल्ह्यातील समस्त सतपंथी अनुयायींनी परमपूज्य महामंडलेश्‍वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सनदशीर मार्गाने सोमवारी, २० मे रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी यांनी स्वीकारले. धर्मांध समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदन देऊन करण्यात आली.

निवेदन देतेवेळी श्रीकांत रत्नपारखी, विजय महाराज, ईश्‍वर पाटील धानोरा, विजय पाटील रावेर, राहुल पाटील निंबोल, देविदास महाजन, अशोक नारखेडे फैजपूर, प्रदीप पाटील, शरद रणधीर, हेमंत झोपे, प्रशांत झोपे, छबिलाल महाजन, ॲड. अविनाश पाटील जळगाव, गजानन चौधरी, प्रदीप महाजन, नंदलाल महाजन, वासुदेव महाजन, कैलास महाजन, सुरेंद्र महाजन, उल्हास महाजन, राजेंद्र चौधरी, विष्णू महाजन, प्रशांत पाटील धानोरा, अनिल महाजन, हेमंत पाटील, विजय पाटील, नंदकिशोर महाजन, तेजस महाजन, अतुल पाटील, पुष्कराज महाजन भुसावळ, आनंदा महाजन, राजेंद्र पवार जांभोरा तसेच संपूर्ण खान्देशातील विटवा, निंबोल, फैजपूर, जांभोरा, भुसावळ, धानोरा, शेंदुर्णी, दापोरी, सावदा, कुंभारखेडा आदी ठिकाणचे सतपंथ अनुयायी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here