साईमत, मलकापूर : प्रतिनिधी
अकोला येथील लोकसभा प्रचारादरम्यान ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांना मुस्लिम समाजाचा भरघोस पाठिंबा मिळाल्याचा राग अनावर होऊन काँग्रेसचा साजिद पठाण याने ॲड. बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी संस्थापक-अध्यक्ष यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ मलकापूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब दामोदर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
नुकत्याच होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुस्लिम समाजाने ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना भर घोसत पाठिंबा देऊन अक्षरशः त्यांना डोक्यावर घेतले असल्याचे चित्र अकोला लोकसभा क्षेत्रात पहायला मिळाले. याच गोष्टीने जिव्हारी लागून तेथील काँग्रेस नेते साजिदखा पठाण याने बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात गरड ओकली आहे. तसेच त्यांच्या सभेला जाणाऱ्या मौलाना व मुस्लिम समाजाच्या लोकांना सुद्धा वाईट बोलून निंदविण्याचा प्रकार त्याने केलेला आहे. हा सर्व प्रकार व्हिडिओद्वारे सर्व सोशल मीडियावर फिरत आहे. अशा आशयाच्या बातम्या काही युट्युब चॅनलवर प्रसारित झाल्या आहेत तर व्हॉटस्ॲप ग्रुपवर एसबीसी डेमोक्रॉसी या न्युज चॅनेलचा व्हिडिओ आहे. व्हीडीओ ओपन केल्यानंतर त्यामध्ये एक मौलाना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यक्रमात गेला असता साजिद खान हा काँग्रेसचा उर्मट मस्तावेल नेता आहे तर साजिद खान पठाण याची चौकशी करुन ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करून त्याच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी तक्रारीद्वारे बाळासाहेब दामोदर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे केली आहे.
निवेदनावर दर्शन गवळी, गौरव इंगळे, डॉ.अमरकुमार आनंद तायडे, प्रा.नरेंद्र सुरडक, सुनील इंगळे, निलेश झनके, कुणाल उमाळे, निखिल झनके, विराज फरपट आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.