साईमत, चाळीसगाव ः प्रतिनिधी
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी, १४ मे रोजी पवारवाडी स्थित विठ्ठल रुख्मिणी मंदिर सभागृहात रयत सेनेच्यावतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन अभिवादन केले. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयजयकाराने परिसर दणाणून गेला होता.
यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला रा.वि.चे शिक्षक आर.बी.जगताप यांनी माल्यार्पण केले तर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे सकल मराठा समाजाचे मार्गदर्शक राजेंद्र पाटील यांनी पूजन केले. कार्यक्रमास रयत सेना संस्थापक-अध्यक्ष गणेश पवार, प्रदेश समनव्यक पी.एन.पाटील, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, शहराध्यक्ष छोटु अहिरे, शहर कार्याध्यक्ष प्रदीप मराठे, शहर संघटक दीपक देशमुख, शहर उपाध्यक्ष सतीश पवार, सुनील पवार, प्रकाश पवार, पप्पू घुले, शाहू मराठा मासिकाचे संपादक प्रशांत गायकवाड उपस्थित होते.