अमळनेरला संत सखाराम महाराज यात्रा उत्सवाला प्रारंभ

0
31

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

येथील संत सखाराम महाराज यात्रा उत्सवाला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर समाधी मंदिरावर प्रारंभ झाला. यावेळी ह.भ.प. प्रसाद महाराज यांनी तालुक्यातील अधिकारी वर्ग, मानकरी, भक्तांना नारळासह खडीसाखर प्रसादाचे वाटप केले. पहाटे प्रसाद महाराज यांनी विठ्ठल रुक्माई, लालजीच्या मूर्तीची पूजासह आरती करून वाजतगाजत महाराज बोरी नदीच्या वाळवंटात समाधी मंदिराजवळ आले. मंदिरातील पुजारी अभय देव, जय देव, सुनील देव, केशव पुरानी, प्रसाद देव यांच्या हस्ते पूजा करून अन्नपूर्णा मुख्य स्तंभारोपण आणि ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर प्रसाद महाराज यांची पूजा करण्यात आली.

यावेळी न्या.गुलाबराव पाटील, लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ, मा.नगराध्यक्ष विनोद पाटील, मा. नगराध्यक्ष जयश्री पाटील, ॲड.ललिता पाटील, वसुंधरा लांडगे, खा.शि.मंडळाचे संचालक डॉ. अनिल शिंदे, प्रकाश पाटील (सुरत), प्रफुल्ल पाटील, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पी.आय. विकास देवरे, मुख्याधिकारी तुषार नेरकर, उपमुख्य अधीक्षक संदीप गायकवाड, वीज मंडळाचे कार्यकारी अभियंता डी.एच. वैराळे, अभियंता कुरभुंगे, पी.एस.आय. भगवान शिरसाट, राजेंद्र देशमुख, बाबा देशमुख, डॉ. मिलिंद वैद्य, राजेंद्र वैद्य, उदय देशपांडे, महेश कोठावदे, पवन शेटे, मनोज देवकर, केतन जोशी, गंगाधर महाजन, शितल देशमुख, मुन्ना शर्मा, दिलीप पाटील, दिनेश साळुंखे, संजय शिरोडे, गणेश ठाकरे, संजय चौधरी, सोमचंद संदांशिव, मुकुंद विसपुते, गणेश बुवा, सुनील भोई, शिवाजी राजपूत, लोकमान्यचे मुख्याध्यापक मनोहर महाजन, महेश कोठावदे, सुरेश पाटील यांच्यासह भक्तांनी प्रसाद महाराजांचे दर्शन घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here