साईमत, भुसावळ : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबई येथे झालेल्या २६/११ आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे हे पाकिस्तानचा आतंकवादी अजमल कसाबच्या हल्ल्यात शहीद झाले नसून पोलिसांच्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला असल्याचे बेताल वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले. या वक्तव्याचा भुसावळ तालुका शिवसेनेच्यावतीने मंगळवारी, ७ मे रोजी शहरातील गांधी पुतळा भागात जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेतर्फे वडेट्टीवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून जाहीर निषेध केला. वडेट्टीवार यांनी त्यांचे विधान मागे घेण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली.
यावेळी भुसावळ तालुका विधानसभा प्रमुख संतोष माळी, महिला जिल्हा संघटीका नंदा निकम, शहरप्रमुख पवन नाले, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश निकम, अल्पसंख्यांक आघाडीचे उपजिल्हाप्रमुख हमीद पठाण, युवा सेना युवा जिल्हाधिकरी पवन भोळे, शहर संघटक सोनी ठाकूर, शिवसैनिक सुरेश धंडोरे, उपशहर संघटक सौरभ पवार, विभाग प्रमुख किरण महाले, वैशाली विसपुते, आकाश निकम, सुनंदा बगाडे, इंदुबाई सोनवणे, मंजुलाबई महाजन, ममता नरवाडे, ज्योती तायडे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
