पाळधीला दिल… दोस्ती… दुनियादारीचा… आला प्रत्यय

0
22

साईमत, पहुर, ता.जामनेर : प्रतिनिधी

येथून जवळील पाळधी येथील रहिवासी धनराज शेनफडू बाविस्कर (वय ३६) हे सुप्रीम कंपनीत कामाला होते. ते काम संपल्यावर घरी येताना त्यांचा अपघातात मृत्यू झाला. मयत मित्राच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी २००० मधील दहावीच्या बॅचचे वर्गमित्र सरसावले आहे. त्यांनी सर्वांनी एकत्र येत २१ हजाराची मदत केली आहे. त्यामुळे दिल…दोस्ती… दुनियादारीचा… सर्वांना प्रत्यय आला आहे. मैत्री म्हणजे सुखात समोरच्याला हात देणे, मैत्री म्हणजे दुःखात समोरच्याचा हात होणं तसेच ‘जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी’ अशी पंक्ती याठिकाणी तंतोतंत लागू पडली. अन्‌ हे मित्रत्व पाहून अनेकांनी मैत्रीला सलाम केला आहे. तसेच मित्राच्या दुःखात सहभागी होऊन वर्गमित्रांनी मैत्री जपल्याने परिसरातून मैत्रीच्या अतूट नात्याचे कौतुक होत आहे.

पहुर येथून जवळील पाळधी येथील धनराज शेनफडू बाविस्कर हे गेल्या वर्षांपासून सुप्रीम कंपनीत कामाला होते. गेल्या २८ एप्रिल रोजी काम संपल्यानंतर घरी येत असताना त्यांचे अपघाती निधन झाले. धनराज हा घरातील कर्ता पुरुष असल्याने त्यांच्या जाण्याने पत्नी, आई-वडील व मुले असा संपूर्ण परिवार हवालदिल झाला. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने आपल्या मित्राच्या कुटुंबाला थोडासा आर्थिक हातभार लागावा, या उद्देशाने वर्गमित्रांनी आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर मॅसेज टाकला. सर्वांनी कुटुंबाला यथाशक्ती मदत केली. त्यात २१ हजार रुपये जमा झाले. ही रक्कम धनराज बाविस्कर यांच्या परिवाराला नुकतीच सुपूर्द करण्यात आली.

यावेळी दिनेश परदेशी, सुरेश माळी, संजय चौधरी, भागवत इंगळे, सुनील सावळे, रामलाल शिंदे, अर्जुन माळी, गणेश वाणी, बालू परदेशी, कैलास सोनवणे, संजय शेळके उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here