साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
कन्नड घाटात सध्या अवजड वाहनांना बंदी असल्याने घाटातून लहान वाहने, चारचाकी व दुचाकी वाहने सुरु आहे. घाटात ट्रॅफिक कमी झाल्याचा फायदा अज्ञात चोरट्यांनी घेतला आहे. चाळीसगाव कन्नड घाटाच्या किनाऱ्यावर लावलेले लोखंडी पत्र्याचे बॅरेकेट्स मटेरियल चोरीस जात आहे. याकडे नॅशनल हायवे विभागासह पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.
आता २५ टक्के आधीच बॅरेकेट्स चोरी झाल्याचे समजते.आता जे बॅरेकेट्स उरले आहे ते पण चोरीस जाण्याची शक्यता आहे. कारण हे पत्री बॅरेकेट्स रस्त्याच्या किनाऱ्यावरून उतरवून खाली ठेवल्याचे दिसत आहेत. हे बॅरेकेट्स चोरीस जाण्याची शक्यता दिसते. याकडे महामार्ग नॅशनल हायवे पोलिसांनी व नॅशनल हायवे विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. या आधीचे बॅरेकेट्स गायब झालेले आहे. त्याचा तपास पोलिसांनी लावावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.