साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
बदलापूर-ठाण्यातील प्रेरणा फाउंडेशनतर्फे समृद्धी शिक्षक फाउंडेशचे संस्थापक-अध्यक्ष सतीश साहेबराव सूर्यवंशी यांना शैक्षणिक, साहित्य व सामाजिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कल्याण येथे आचार्य प्र.के. अत्रे नाट्यमंदिरात संस्थेच्या संस्थापिका-अध्यक्षा दिप्ती गावकर यांच्या हस्ते राज्यस्तरीय ‘माणुसकी रत्न’ पुरस्कार २०२४ देवून नुकतेच सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेच्या सचिव वैभव कुलकर्णी, उपखजिनदार दिव्या गावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रेरणा फाउंडेशन, बदलापूर ठाणे आणि प्रेरणा रंगमंच नाट्य मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने प्रेरणा फाउंडेशन संस्थापिका-अध्यक्षा व प्रेरणा रंगमंच नाट्यमंडळ लेखिका, नाटककार, दिग्दर्शिका दिप्ती गावकर यांचा ‘आकांत’ नाटकाचा नाट्य प्रयोग शनिवारी, ४ मे रोजी आचार्य प्र. के.अत्रे नाट्यमंदिर, कल्याण येथे आयोजित केला होता. किनारा रेसिडेन्शियल स्पेशल चाईल्ड मतीमंद स्कूल वांगणी गतीमंद बालकांच्या मदतीसाठी आयोजित केलेल्या ‘आकांत’ नाटकाच्या नाट्य प्रयोगास मदत करून गतीमंद मुलांना आधार दिला. आपले शिक्षण, साहित्य व सामाजिक कार्य उल्लेखनीय असून समाजाला प्रेरणा देणारे आहे. आपल्या कार्याचा सन्मान ठेवून राज्यस्तरीय ‘माणुसकी रत्न’ पुरस्कार या सन्मानाने प्रेरणा फाउंडेशनच्या संस्थेच्या अध्यक्षा दिप्ती कुलकर्णी यांच्या हस्ते सतीश सूर्यवंशी यांना गौरविण्यात आले.
सतीश सूर्यवंशी हे पिंपरखेड तांडा येथील वाडीलालभाऊ राठोड माध्यमिक आश्रमशाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते शाळेत अनेक नानाविध स्पर्धा व उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाठी सतत कार्यरत असतात. शाळा, विद्यार्थी, शिक्षक, समाज या चौकोनातून सामाजिक व शैक्षणिक विविधांगी विकासासाठी कार्य करणाऱ्या समृद्धी शिक्षक फाउंडेशनचे ते संस्थापक-अध्यक्ष आहेत. तसेच महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे (एमएसपी) जळगाव जिल्हा समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. अशा उपक्रमशिल शिक्षकांची कार्याची दखल घेऊन त्यांना प्रेरणा फाउंडेशनतर्फे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सतीश सूर्यवंशी यांना मुख्याध्यापक एच. बी. राठोड , प्राचार्य बी. पी. पाटील, पर्यवेक्षक सी.डी. पाटील व शिक्षकांचे सतत मार्गदर्शन लाभते. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष जी. जी. चव्हाण, उपाध्यक्ष मच्छिंद्रनाथ राठोड, चिटणीस राजेश वाडीलाल राठोड, संचालक योगेश चव्हाण, कार्यकारी संचालक मंडळ यांनी कौतुक केले आहे. यापूर्वीही उपक्रमशिल शिक्षक म्हणून त्यांना अनेक विविध पुरस्काराने सन्मानित केले आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.