पहुरचे माजी सभापती प्रदीप लोढा भाजपात दाखल

0
112

साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर

येथील माजी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती प्रदीप लोढा यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास पाटील, शेंदुर्णी जीन प्रेसचे माजी चेअरमन श्‍यामराव सावळे आदींनी जळगाव येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी, २५ एप्रिल रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर श्री.लोढा यांच्यासह त्यांच्या असंख्य समर्थकांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर विश्‍वास दाखवत भाजपात प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, खा.रक्षा खडसे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. श्री. लोढा यांच्या प्रवेशाने पहूरच्या राजकीय वर्तुळात भाजपचे पारडे जड झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here