कौशल्ये वाढवा, समर्पण ठेवा, संशोधनात आंनद घ्या – सिए दर्शन जैन

0
45

साईमत जळगाव प्रतिनिधी

आपण विज्ञान लहानपणापासून शिकत आलो आहोत, परंतु फक्त पाठांतर न करता, सर्व आंधळेपणाने न स्वीकारता आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले पाहिजेत. तंत्रज्ञान प्रत्येक क्षणाला बदलत आहे. त्यामुळे कौशल्ये वाढवा , समर्पण ठेवा व संशोधनात आंनद घ्या असा संदेश देत त्यांनी कठोर मेहनत, नियमितता आणि वक्तशीरपणा याचे महत्त्व जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे अॅडव्हायझरी बोर्ड व आयक्यूएसीचे मेंबर सिए दर्शन जैन यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाचा दुसरा दीक्षांत समारंभ नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. त्या प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा. एस.टी.इंगळे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे अॅडव्हायझरी बोर्ड व आयक्यूएसीचे मेंबर सिए दर्शन जैन उपस्थित होते. व्यासपीठावर जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, बोर्ड ऑफ गव्हर्नन्स मेंबर प्रमोद संचेती, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, परीक्षा नियंत्रक गौरव तिवारी , रजीस्टार अरुण पाटील आदींची उपस्थिती होती.

प्रास्ताविक जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्याच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले.

सिए दर्शन जैन यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “आजचा दिवस तुमच्या आई वडिलांकरीता अभिमानाचा क्षण आहे .विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीनुसार क्षेत्र निवडून सर्वश्रेष्ठ कामगिरी करावी असे सांगितले. आताच्या वैज्ञानीक जगात विद्यार्थी सर्वगुण संपन्न असला पाहिजे तसेच त्याच्यामध्ये संशोधक जिज्ञासू वृत्ती असली पाहिजे, आपल्याकडे संशोधन, संस्कृती रुजवली गेली पाहिजे असे सांगितले.

प्र. कुलगुरू प्रा. एस.टी.इंगळे म्हणाले की, “बियोंड व्हिजन” हे ब्रीद वाक्य हाती घेवून रायसोनी इस्टीट्यूटने आतापर्यतच्या आपल्या कार्यकाळात अनेक विकासपर्व गाठले आणि इस्टीट्यूटची यशस्वी घौडदौड कायम राखत झपाट्याने प्रगती केली. ‘प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात पदवी संपादन करणे हे मोठे यश असते. त्याच्यासाठी आणि त्याच्या पालकांसाठी ती अभिमानाची बाब असते. शिक्षण संस्थांसाठी हे विद्यार्थी त्यांचे राजदूत म्हणून व्यावसायिक जीवनात प्रवेश करतात. विद्यार्थी त्यांच्या नव्या आणि स्वतंत्र मार्गावर वाटचाल सुरू करतात. वेगळ्या पद्धतीने विचार करू लागतात. त्यांनी शिक्षण घेताना प्राप्त केलेले ज्ञान आणि व्यावसायिक कौशल्यांचा उपयोग समाजासाठी मोलाचे योगदान देण्यासाठी करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातून पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या एमबीए, एमसीए, बीबीए, बीसीए, बी.ई.-आयटी, बी.ई.-ई अँड टी सी, बी.ई.-ईई, बी.ई.-सीई, बी.ई.-एमई, बी.ई.-सीएसई असे सर्व शाखेचे एकूण ७१२ पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अंजली बियाणी यांनी केले तर यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

“सुवर्ण पदकां”चे मानकरी

निखिल किरण पाटील (एमबीए), शेफाली नामदेव मंधान (एमएमएस), आचल संजय कांकरिया (एमसीए), कांचन भास्कर माळी (बीबीए), ममता भाऊसाहेब पाटील (बीसीए), माधुरी ज्ञानेश्वर घुगे (बी.ई.-सीएसई), सय्यद शाहनवाझ अमिनुद्दीन (बी.ई.-आयटी) दिपक महावीर सैनी (बी.ई.-एमई), कार्तिक महेश पाटील (बी.ई.-सीई), शुभम सुसंता रॉय (बी.ई.-ईई), पल्लवी प्रदिप सुर्वे (बी.ई.-ई अँड टी सी)

“रौप्य पदकां”चे मानकरी

यश जगदीश लढढा,(एमबीए), बेदमुथा वृषाली राकेश (एमसीए), रामचंदानी गुंजन दिलीप (बीबीए), चिंचोरे मोहिनी मनोहर (बीसीए) थोरात प्राजक्ता भारत (बीसीए), जैन हार्दिक प्रफुलकुमार (बी.ई.-सीएसई), चित्ते दिव्या भास्कराव (बी.ई.-आयटी)खंबायत भूषण खेमचंद्र (बी.ई.-एमई), भोपले नयना संजय(बी.ई.-सीई), सपकाळे हर्षदा देविदास(बी.ई.-ईई), कासार वैष्णवी प्रमोद (बी.ई.-ई अँड टी सी)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here