चाळीसगावला स्वयंदीप परिवारातर्फे दिव्यांग आदिवासी मुलीचे ‘शुभमंगल’

0
31

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

येथील मिनाक्षी निकम यांच्या अपंग आणि दिव्यांगांसाठी स्वयंदीप परिवारातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येतात. अशातच परिवारातील नवापूर येथील दिव्यांग भगिनीला नाशिक जिल्ह्यातील ‘जीवनसाथी’ मिळाला आहे. चाळीसगावला स्वयंदीप परिवारातर्फे दिव्यांग आदिवासी मुलीचे ‘शुभमंगल’ नुकतेच पार पडले. तिचा विवाह नाशिक जिल्ह्यातील पिंपरी, नांदगाव येथील रहिवाशी अनिल कासार यांच्याशी झाला आहे. याबद्दल विवाहाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथील वडील नसलेली आदिवासी कुटुंबातून कु.रजनी पाडवी ही दिव्यांग मुलगी स्वयंदीप परिवारामध्ये गेल्या अनेक वर्षापासून होती. स्वयंदीप संस्था ही दिव्यांग भगिनींसाठी निवासी संस्था आहे. इथे दिव्यांगांचे सर्वपरीने पुनवर्सन केले जाते. त्यात लग्न हाही उद्देश महत्त्वाचा आहे. दिव्यांग भगिनींना निवासी रोजगार प्रशिक्षण देत असताना अशा कितीतरी भगिनी कुटुंबापासून वंचित असतात.

निराधार, अनाथ, वंचित अशा दिव्यांग भगिनींचे हक्काचे घर म्हणजे स्वयंदीपमध्ये अनेक भगिनी येतात. काही प्रशिक्षण घेऊन स्वतःचा रोजगार करतात. काही कायमस्वरुपी निवासी त्यात त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार कला, कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाते. उद्देश एकच दिव्यांग भगिनी समाजाच्या प्रवाहात सक्षमपणे उभी रहावी, शिक्षण, प्रशिक्षण, रोजगारावर त्यांचा विवाह लावून त्यांचे संसाराचे स्वप्न पूर्ण करणे, याप्रमाणे दरवर्षी सहा ते सात भगिनींचा विवाह थाटामाटात केला जातो. याप्रमाणेच बाहेरच्या उष्णतेचा विचार करून हा विवाह अगदी साध्या पद्धतीने घरातल्या घरात नुकताच पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here