साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर
येथे दरवर्षी श्रीराम नवमीनिमित्त गावातून भव्य अशी शोभायात्रा काढली जाते. हे सर्व नियोजन रामराज्य फाउंडेशनचे सर्व सदस्य करीत असतात. यावर्षीही मोठ्या उत्साहाने गुरुवारी, १८ रोजी सायंकाळी रामराज्य गेट येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. गावातून वाजत गाजत श्रीराम जन्मोत्सवाचे स्वागत करण्यात आले. शोभायात्रेत श्रीराम, सीता, लक्ष्मण यांचे सजीव देखावे आणि उंच अशा श्रीराम यांच्या मूर्ती लक्ष वेधून आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरल्या. संपूर्ण गावातून मिरवणूक शांततेत पार पडली.
यावेळी लोहारा ग्रामपंचायतीचे सरपंच अक्षयकुमार जैस्वाल, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सुनील क्षीरसागर, भाजपाचे ज्येेष्ठ कार्यकर्ते शरद सोनार, राहुल कटारिया, श्रीकृष्ण भीवसने, संतोष कोळी, हेमंत गुरव तसेच राजकीय, सामाजिक, नागरिक, महिला, आबालवृद्ध यांनी शोभायात्रेत सहभागी होऊन पूजन केले.
यशस्वीतेसाठी रामराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष कोळी यांच्यासह सर्व सदस्य, बजरंग दल, सर्व सकल हिंदू समाज, ग्रामस्थ मंडळी, लोहाराचे पोलीस पाटील सुरेंद्र शेळके, पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे, लोहारा पोलीस दूरक्षेत्रचे एएसआय अरविंद मोरे, हेडकॉन्स्टेबल शैलेश चव्हाण, कॉन्स्टेबल वाडिले, सर्व पोलीस, होमगार्ड यांनी परिश्रम घेतले.