साईमत, मलकापूर : प्रतिनिधी
येथील बन्सीलाल नगरातील फुले-शाहू-आंबेडकर बहुजन समितीद्वारा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त स्थानिक सम्राट राजे शिव छत्रपती व्यायाम शाळेच्या पटांगणात उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी ‘समतेचे निळे वादळ’ सामाजिक संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष अशांतभाई वानखेडे होते. उद्घाटक म्हणून बांधकाम उद्योजक पिंटू दिवाणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संविधानाचे गाढे अभ्यासक ॲड. जी. डी. पाटील, मराठा सेवा संघाचे सामाजिक कार्यकर्ता मुकेश जगताप, जनता कला, वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य केदार एकडे, समाजभूषण एल. सी. मोरे, ‘समतेचे निळे वादळ’चे युवक जिल्हाध्यक्ष ॲड. कुणालभाई वानखेडे, धम्म प्रचारक व पालीभाषा गाढे अभ्यासक शांताराम इंगळे, ज्येष्ठ पत्रकार उल्हास शेगोकार, डॉ. जी. ओ. जाधव, नत्थु हिवराळे, यशवंत गवई, संबोधी बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष जी. डी. झनके, प्रेमभाऊ इंगळे, डॉ. प्रफुल्ल भोगे, अल्का झनके, डॉ. ढाले यांच्यासह बहुजन जनसमुदाय उपस्थित होते.
कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात जिद्द आणि मेहनतीने कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या कोणताही क्लास न लावता घरीच अभ्यास करून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, नागपूर येथे पहिल्याच प्रयत्नात एमबीबीएस कोर्ससाठी प्रवेश मिळविणारी नेहा मनोहर नरवाडे, दिव्या चंद्रभान निकम रशिया येथे एमबीबीएस, अमित श्रीकृष्ण खराटे नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला, पुणे निवड, एमबीबीएस कोर्स पूर्ण करून मेडिकल ऑफिसर पदावर नियुक्त डॉ. पंकज खांडेकर, दर्शन ज्ञानदेव हेलोडे असी. कन्सल्टंट केआयए बंगळूरू, सुशांत नारायण मनवर ग्लोबल स्टेट कंपनी, पुणे येथे टेस्ट इंजिनियर म्हणून निवड, आदेश राजाराम उमाळे असिस्टंट इंजिनीयर पुणे ह्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात ॲड. जी. डी. पाटील यांनी भारतीय संविधानाची महती अत्यंत प्रभावीपणे समजावून सांगितली. केदार ऐकडे, मुकेश जगताप यांनी डॉ. बाबासाहेबांची जयंती जाती-पाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्रित येऊन बाबासाहेबांच्या विचारांचा एकसंघ भारत निर्माण कसा होईल, ह्यावर भर दिला. अशांतभाई वानखेडे यांनी क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब ह्या गुरू शिष्यांचे पुरोगामी भारत निर्माण बहुमोल कार्याचे अत्यंत समर्पक शब्दात विशद केले. यानंतर भीमगीत गायन कार्यक्रमाचा उपस्थित जनसमुदायाने आनंद घेतला. भीम युवक सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मुलींच्या चमूने सादर केलेला लेझिम आविष्कार अत्यंत प्रेक्षणीय ठरला.
यशस्वीतेसाठी विजय कुमार तायडे, चंद्रमोहन निकम, रवि बाभुळकर, प्रमोद वानखेडे, श्री.मगर, अनिल अवसरमोल, आर. एम. झनके, सतीश गायकवाड, श्री.धुंदले, श्री.खांडेकर, लक्ष्मण वानखेडे, अभिजित इंगळे, दीपक पैठणे, कुणाल इंगळे, श्रीहरी हाताळकर, सौरभ पैठणेे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संदीप वानखेडे, श्री.सुरवाडे तर आभार विजय वाकोडे यांनी मानले.