साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या खासदार पदाचा खा.उन्मेष पाटील यांनी राजीनामा देऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत गटात प्रवेश केल्याने जळगाव लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेत नवचैतन्य संचारले आहे. अशातच चाळीसगाव विधानसभेत वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढविणारे मोरसिंग चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा प्रवेश सोहळा मुंबई येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी पार पडला. यावेळी जळगाव जिल्ह्याचे संपर्क मंत्री संजय सावंत यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे मान्यवर, मातब्बर, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शिवसैनिक उपस्थित होते.
जळगाव लोकसभा मतदारसंघात संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या माध्यमातून शिवसेना उबाठा गटात भाजपाचे खा.उन्मेष पाटील यांनी खासदार पदाचा राजीनामा देत देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. एवढेच नव्हे तर स्वतः उमेदवारी न घेता आपले सहकारी मित्र तथा पारोळा नगरीचे नगराध्यक्ष करण पवार यांना उमेदवारी घेत त्यांनी राजकीय विश्लेषकांना तोंडात बोटे घालायला लावली होती.
आज पुन्हा एकदा चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जोरदार लढत देणारे मुंबई येथील उद्योजक तथा लोंजे येथील भूमिपुत्र मोरसिंग राठोड यांनी शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. मोरसिंग राठोड यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत डोंगर घाटमाथा पट्ट्यातील बंजारा समाजाची लक्षवेधी मते घेत ३८ हजार ७०० मते घेतली होती. तिसऱ्या क्रमांकाची दमदार लढत दिली होती. आज उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी उबाठा गटात प्रवेश केल्याने जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार करण पाटील यांच्या विजयाची घोडदौड सुरू झाली आहे.
उबाठात जोरदार इनकमिंग
आजच्या सोहळ्यात शिंदे गटाच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. अस्मिता पाटील, भारत राष्ट्र समिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण गंगाधर पाटील उर्फ लकी टेलर, जळगावच्या माजी नगरसेविका सरिता नेरकर, वंचित बहुजन आघाडीचे चाळीसगाव येथील नेते मोरसिंग राठोड यांच्यासह इतरांनी पक्षात प्रवेश घेतला.
यांचा झाला पक्ष प्रवेश
आजच्या प्रवेश सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे यात पाचोरा-भडगाव मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात पदाधिकारी पक्षात दाखल झाले. यात शिंदे गटाच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. अस्मिता पाटील यांच्यासह युवक राष्ट्रवादीचे माजी जिल्हा कार्याध्यक्ष तथा लासुरे येथील रहिवासी अजय रंगराव देवरे, पंचायत समितीचे माजी सभापती तथा पिंपळगाव हरेश्वर येथील रहिवासी देविदास रामदास महाजन, लासुरे येथील माजी ग्रामपंचायत सदस्य कपिल शिवाजी देवरे, लासुरे येथीलच सामाजिक कार्यकर्ते पंकज सुभाष देवरे, पाचोऱ्याचे माजी उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे प्रवक्ता शेख रसूल शेख उस्मान, पाचोरा येथील अल्पसंख्यांक कार्यकर्ता फिरोज पिंजारी, भडगाव येथील बशीर करीम शेख, कामरान बशीर शेख, इलियास अब्बास अली, शाहबाज इफ्तीखार सय्यद, अहमद शमीउद्दीन शेख, भडगाव येथील सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक बशीर शेख, भडगाव येथीलच राजू शेख, अभियंता मोहन परदेशी, वकील संघाचे सदस्य मोहसीन शेख, सामाजिक कार्यकर्ता साबीर शेख, शफीक टेलर, उषा परदेशी, गायत्री पाटील, शब्बीर खान, शेख इब्राहिम, शेख अख्तर मुल्ला, शेख सलीम, अजमल खान, शेख खालीक, जुवार्डी येथील माजी सरपंच नाना रामदास पाटील, जुवार्डी विकासोचे चेअरमन प्रकाश रामराव पाटील, शिवाजी लक्ष्मण पाटील, आबा केशव पाटील व संजय शिवराम पाटील या मान्यवरांनी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी माजी मुख्यमंत्री तथा पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे, संपर्क प्रमुख संजय सावंत, खा.उन्मेष पाटील, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, ज्येष्ठ नेत्या वैशाली सूर्यवंशी, महानगराध्यक्ष शरद तायडे, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.