जामनेरला महामानवांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराला प्रतिसाद

0
33

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन सामाजिक बांधिलकी जपण्याकरीता महामानवांच्या जयंतीनिमित्त डॉ.उमाकांत पाटील, डॉ.प्रशांत पाटील संचालक श्रीलिला हॉस्पिटल, जामनेर आणि इंडियन रेड क्रॉस संस्थेच्यावतीने नुकतेच महारक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरात अनेक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक संस्थेच्या सभासदांनी तसेच रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून अनेक ज्ञात-अज्ञात रुग्णांना जीवनदान देण्याच्या उद्देशाने सामाजिक बांधीलकी जोपासली. यावर्षी १८१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात सहभाग नोंदविला. त्यात महिलांचेही योगदान कौतुकास्पद ठरले. शिबिराप्रसंगी अनेक मान्यवरांनी भेटी देऊन श्रीलीला हॉस्पिटलच्या माध्यमातून उत्कृष्ट उपक्रमाचे कौतुक केले. सुरवातीला महामानवांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यांचे लाभले योगदान

शिबिराला जामनेर तालुका मराठा सेवा संघ, श्री संत सावता तरुण मित्र मंडळ माळी गल्ली, महात्मा फुले मित्र मंडळ कन्या शाळा, क्रांतीसूर्य फाउंडेशन, हनुमान व्यायामशाळा तरुण मित्र मंडळ बजरंगपुरा, नमन फाउंडेशन, समता सैनिक दल भीमनगर, त्यागमूर्ती रमाई आंबेडकर विचारमंच जामनेर पुरा, त्रिरत्न बुध्दविहार सम्राट अशोक नगर, दोस्ती यारी ग्रुप, भिमगर्जना मित्र मंडळ, सिध्दार्थ हौसिंग सोसायटी जामनेर पुरा, जामनेर शहर रजि. प्रॅक्टिशनर व मेडिकल डिलर असोसिएशन, शिक्षक मित्र परिवार, जय भवानी तरुण मित्र मंडळ गणेशवाडी, श्रीराम जन्मोत्सव समिती गणेशवाडी, संत सेवालाल महाराज असोसिएशन, संतोषी माता मित्र मंडळ गिरजा कॉलनी, अमित टेन्ट हाऊस, संभाजी ब्रिगेड जामनेर तालुका, सर्व पत्रकार बांधव, फोटोग्राफर असोसिएशन जामनेर, गोपाळ समाजहित महासंघ जळगाव जिल्हा, कन्हैय्या मित्र मंडळ इंदिरा आवास, चौकडा हनुमान मित्र मंडळ जामनेर यांचे योगदान लाभले.

यशस्वीतेसाठी डॉ.उमाकांत पाटील, डॉ.प्रशांत पाटील, डॉ.अनिल पाटील, विनोद पाटील, श्री.धोनी, योगेश पाटील, अनिल डोंगरे, मनोज पाटील, पवन चव्हाण, मनोज माळी आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here