पहुरला कृषी पंडित मोहनलाल लोढा पतसंस्थेतर्फे गुणवंतांचा गौरव

0
18

साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर

येथील कृषी पंडित मोहनलाल लोढा पतसंस्थेतर्फे पहुर परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक तथा माजी कृषी सभापती प्रदीप लोढा, संस्थेचे चेअरमन बाबुराव पांढरे, संस्थेचे संचालक प्रल्हाद वानखेडे, प्रकाश लोढा, योगेश बनकर, विकास लोढा, भरत सोनार, राजूभाई जेंटलमेन, अहमद तडवी, कैलास पाटील, शेंदुर्णी खरेदी विक्री जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे माजी चेअरमन शाम सावळे, राजू पाटील, कैलास देशमुख यांच्यासह सर्व संचालक, सभासद, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

यावेळी डॉ. यश प्रफुल्लकुमार लोढा (एमबीबीएस), ईशा हिरालाल बारी(इलेक्ट्रॉनिक्स) क्षेत्रात जपान येथे ट्रेनिंगसाठी, लवकेश अशोक लहासे (तलाठी) म्हणून निवड, शिवाजी एकनाथ घोलप (तलाठी) म्हणून निवड, डॉ. स्नेहल शामराव सावळे, डॉ. संपदा शरद पांढरे,
डॉ.निलेश गोकुळ कुमावत, डॉ. रामेश्‍वर दीपक पाटील, डॉ. शुभम विलास पांढरे (सर्व बीएएमएस), डॉ. रोहिणी गोपाल थोरात (बीडीएस), ज्ञानेश्‍वर अशोक देशमुख (एलएलबी) अशा सर्व विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उत्कृष्ट यश संपादन केल्याने त्यांना संस्थेतर्फे शाल, पुष्पहार देऊन गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here