नांद्रा प्र.लो.तून शेगाव पायी दिंडीला प्रारंभ

0
22

साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर

जामनेर तालुक्यातील नांद्रा प्र.लो. ते श्रीक्षेत्र गजानन महाराज संस्थान, शेगाव पायी दिंडी सोहळा उत्साहाने पार पडत असतो. यंदा पायी दिंडी सोहळ्याचे दुसरे वर्ष आहे. श्रीहरींच्या कृपेने साधुसंतांच्या आशीर्वादाने आणि नांद्रा प्र.लो., रोटवद, नाचणखेडा, पाळधी वारकऱ्यांच्या आणि भजनी मंडळाच्या सहकार्याने श्री गजानन महाराज मंदिर, नांद्रा यांनी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले आहे. दिंडीला प्रारंभ झाला असून भाविक भक्त भक्तिरसाचा आनंद लुटत आहे. ‘गण गण गणात बोते’ च्या गजरात भाविक तल्लीन झाले आहेत.

दिंडीला बुधवारी, ३ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता श्री संत गजानन महाराज मंदिर नांद्रा प्र.लो. येथून प्रारंभ झाला. पुढे नाचणखेडा, पाळधी, सोनाळा, मुळगाव, शहापूर, शेंगोळा, लोणी, फत्तेपूर, तोरणाळा, देऊळगाव गुजरी, धामणगाव बढे, किनोळा, रोहीणखेड, टाकळी, कोथळी, कंडारी, पिंपळगाव राजा, जळका, घाटपुरी, तिवडी, शेगाव असा हा प्रवास असणार आहे. दिंडीसाठी ह.भ.प. मुकुंद महाराज, (नांद्रा प्रलो), ह.भ.प. अविनाश महाराज, ह.भ.प. मंगेश महाराज (नाचणखेडेकर) यांचे मार्गदर्शन लाभत आहे. दिंडी सहाय्यक ह.भ.प. विकास पाटील, बापू मोरे, बाळू पाटील, अनिल पाटील, विजय महाराज, सुरेश पाटील, आधार पाटील तसेच समस्त भजनी मंडळ सार्व. मृदंगाचार्य ह.भ.प. शुभम कोळी, नयन सोनवणे, श्‍याम पाटील यांच्याकडे सेवा राहील.

यशस्वीतेसाठी चोपदार ह.भ.प.ज्ञानेश्‍वर महाराज, नरेंद्र महाराज, सुनील महाराज सहकार्य करीत आहे. ह.भ.प.पवन महाराज, ह.भ.प. भगवान महाराज गांगुर्डे, नांद्रा हे विणेकरी आहेत. दिंडीचे नियोजक ह.भ.प. भरतसिंग जाधव, तोरणाळा हे आहेत. तसेच वाहन सौजन्य संजय रघुनाथ पाटील, मिलिंद कौतिक गांगुर्डे, नांद्रेकर यांचे आहे. दिंडीच्या अधिक माहितीसाठी अविनाश वाघ, सुनील पाटील यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here