साईमत जळगाव प्रतिनीधी
शहरातील गिरणा पाण्याची टाकी परिसरातील रहिवासी शेठ धनराज फुलचंद ललवाणी (वय ९१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी केलेल्या संकल्पानुसार त्यांचे देहदान डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात करण्यात आले.
शेठ धनराज ललवाणी हे मूळचे शेंदुर्णी (ता.जामनेर) येथील मूळ रहिवासी व प्रसिद्ध सराफा व्यावसायिक होते. ते शेंदुर्णी येथील जैन ओसवाल संघाचे समारे २० वर्ष संघपती होते. त्यांनी त्यांचे कनिष्ठ पूत्र कांतीलाल ललवाणी यांना सुमारे ४० वर्षांपूर्वी किडनी दान करून मुलाला जीवनदान (अभयदान) दिले आहे. त्यांनी १० वर्षांपूर्वी संकल्प करून रितसर अर्ज भरून दिलेला होता. ते अतिशय धार्मिक विचारांचे आणि गरजूंना शक्य ती मदत करणारे, म्हणून परिसरात परिचित होते. त्यांच्या पश्चात दोन मुलं, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते पंजाब नॅशनल बँकेचे माजी कॅशियर पारसमल ललवाणी (अमळनेर) व डॉ .हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळ (शेंदुर्णी) चे सचिव कांतीलाल ललवाणी (जळगाव) यांचे वडील होत.