साईमत जळगाव प्रतिनीधी
खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित आयएमआरमधील एमबीएचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी तेजस शिंपी याची ॲक्सिस बँकेत कॅम्पस ड्राइव्हद्वारे निवड झाली आहे. त्याची ही निवड असिस्टंट मॅनेजर पदावर झाली असून, त्याला वार्षिक ४ लाख ४० हजार रुपयांचे पॅकेज मिळाले आहे.
ॲक्सिस बँकेच्या कॅम्पस ड्राइव्हद्वारे यावर्षी आयएमआरच्या वतीने ८ विद्यार्थ्यांनी टेस्ट आणि ऑनलाइन इंटरव्यू दिले. यात तेजस शिंपी याची निवड झाली असून, अजून दोन विद्यार्थ्यांचे निर्णय बाकी आहेत. याबाबत केसीई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे आणि आयएमआरचे संचालक डॉ. बी.व्ही. पवार यांनी तेजसचे कौतुक केले. यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट हेड पुनीत शर्मा यांनी परिश्रम घेतले.